Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम, बजरंग खरमाटे यांच्या घरीही आयटीची छापेमारी; शिवसेनेचे धाबे दणाणले

युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे.

आता अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम, बजरंग खरमाटे यांच्या घरीही आयटीची छापेमारी; शिवसेनेचे धाबे दणाणले
आता अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम, बजरंग खरमाटे यांच्या घरीही आयटीची छापेमारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 12:02 PM

मुंबई: युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने (it department) धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (sanjay kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

स्थानिक शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम राहतात. कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय असून केबल व्यावसायिक आहेत. त्यांच्या अंधेरीच्या घरी आयकर विभागाचे एक पथक आले असून त्यांनी छापेमारी सुरू केली आहे. त्यांच्या इमारतीच्या खाली केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे पुण्यातही आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारल्याचं वृत्त आहे.

कनाल यांच्या घरी छापेमारी

दरम्यान, आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी; आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

कोण आहेत राहुल कनाल, ज्यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकलीय? आदित्य ठाकरेंशी कनेक्शन?

कामावर रुजू झाल्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, एसटीचं गोपनीय पत्रं उघड, पडळकर, खोतांकडून पत्राची होळी

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.