Corona JN 1 Strian | कोरोनोचा धोका वाढतोय, मुंबईत सापडले तब्बल इतके रूग्ण
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली पाहायला मिळाली आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही आकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहेत.
मुंबई : कोरोनोचा धोका दिवसेंदिलवस वाढत चालल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. राज्यात आज नवीन 28 रूग्ण वाढले आहेत. यामधील राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येच एका दिवशी मोठ्या संख्येने रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे. आज मुंबईत नव्याने 13 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. नवा JN 1 व्हायरसही घातक असल्याचं दिसत आहे. मुंबईकरांनो वेळीच काळजी घ्या नाहीतर धोका आणखी वाढायला वेळ लागणार नाही. राज्यात एकूण 168 सक्रिय रूग्ण आहेत.
मुंबईची सविस्तर आकडेवारी
मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत नव्याने 13 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईत एकूण 76 कोरोना रुग्ण सक्रिय असून आज रुग्णालयात 3 रुग्ण दाखल झाले आहेत. महानगरपालिकेकडे असलेल्या 4,215 बेड्सपैकी 8 बेडवर सध्या कोरोना रुग्ण आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात एकूण 52 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.
देशातील आकेडवारी धडकी भरवणारी
कोरोनामुळे आतापर्यंत 6 जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये केरळमधील तिघांचा, कर्नाटकमध्ये दोन आणि पंजाबमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मागील दोन आठवड्यांमध्ये कोरोनामुळे एकूण 22 वर बळींचा आकडा पोहोचला आहे.सर्दी, खोकला, अंगदुखी, गळ्यात त्रास आणि ताप अशी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लक्षणे आहेत.
कोरोना महामाहारीमध्ये जगभरात थैमान घातलं होतं. महाराष्ट्रात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील प्रशासन खबरदारी घेत असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी अधिकार्यांना योग्य मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.