कोविड सेल्फ टेस्ट किटमुळे धोका वाढला, रुग्ण करतायेत घरातच टेस्ट; मुंबईमध्ये किटवर बंदी

| Updated on: Jan 09, 2022 | 7:57 PM

मुंबईमधील अनेक रुग्ण हे कोविड सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत. या किटच्या मदतीने ते आपल्या घरीच कोरोनाची टेस्ट करतात. अनेक जण लक्षणे आढळल्यानंतर देखील कोरोना टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जात नाहीत. यामुळे रुग्णाची खरी आकडेवारी समोर येण्यास अडच निर्माण होत आहे.

कोविड सेल्फ टेस्ट किटमुळे  धोका वाढला, रुग्ण करतायेत घरातच टेस्ट; मुंबईमध्ये किटवर बंदी
घाटकोपर येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची महापौरांनी भेट घेऊन केले सांत्वन
Follow us on

मुंबई :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झपाट्याने होत आहे. सलग तीन दिवसांपासून 40 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी अर्धे म्हणजे तब्बल वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईमधील आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा एक महत्त्वाचे कारण आता समोर आले आहे. मुंबईमधील अनेक रुग्ण हे कोविड सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत. या किटच्या मदतीने ते आपल्या घरीच कोरोनाची टेस्ट करतात. अनेक जण लक्षणे आढळल्यानंतर देखील कोरोना टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जात नाहीत. घरीच कोरोना टेस्ट करत असल्यामुळे कोरोनाचा योग्य आकडा समोर येत नाही, तसेच कोरोनाबाधित रुग्णाची ओळख लपून राहात असल्यामुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अशा किटवर मुंबईमध्ये बंदी येऊ शकते. तसे संकेत मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी दिले आहेत.

अचून निदानाची खात्री नाही

मुंबईमध्ये कोविड सेल्फ टेस्ट कीटचा वापर मोठा प्रमाणात वाढला आहे. मात्र अशा पद्धतीने टेस्ट करण्यात अनेक धोके आहे. यातील सर्वात मोठा धोका म्हणजे अशा पद्धतीने केलेल्या टेस्टचा अहवाला हा अचूनक असेलच असे ठामपणे सांगता येत नाही. तसेच अशा पद्धतीने करण्यात आलेल्या टेस्टमुळे अनेक रुग्णांची ओळख लपून राहाते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढतो. अशा कोरोना कीटवर बंदी आणली जावी अशी मागणी वैद्यकीय तज्ज्ञांकडून देखील करण्यात येत आहे.

काय म्हणाल्या महापौर?

याबाबत बोलताना महापौर म्हणाल्या की , मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जण लक्षणे आढळल्यास घरीच कोरोना चाचणी करतात मात्र अशाचाचणीमुळे कोरोना धोका आणखी वाढला आहे. आम्ही अशा प्रकारच्या किटवर पूर्णपणे बंदी आणणार आहोत. तसे आदेश महापालिकेच्या आरोग्यविभागाला देण्यात आले आहेत. मेडिकलमध्ये सेल्फ कोरोना किट आढळल्यास  ते जप्त करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

‘होय! अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला’, करीनापासून लारा दत्तापर्यंत, कोणती अभिनेत्री काय म्हणाली?

Corona : अशी ओळखा डेल्टा, ओमिक्रॉनची लक्षणे; लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

डोके दुखीचा त्रास होतोय?, ‘हे’ घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज