Republic Day : देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण
राज्यासह देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. राजपथावर देशाच्या सामर्थ्याचं दर्शन होत आहे.
नवी दिल्ली : देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण (Republic Day) करण्यात आले. या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात (Republic Day) आला.
राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राजपथावर देशाच्या सामर्थ्याचे आणि सांस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ आणि भारतीय सैन्य दलांचे जवान आपले सामर्थ्य जगाला दाखवले.
[svt-event title=”ज्ञानेश्वरांना अभिवादनाने राज्यापालांच्या भाषणाला सुरुवात, छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही” date=”26/01/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]
ज्ञानेश्वरांना अभिवादनाने राज्यापालांच्या भाषणाला सुरुवात, छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीhttps://t.co/ABhx4vrITy
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा” date=”26/01/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा, शिवाजी महाराजांच्या समुद्रीसीमा बंदिस्ती करण्यासाठी उभारलेल्या आरमाराची प्रतिकृती शिवाजी पार्कच्या संचलनात, आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांची यशोगाथा सांगणारा हा चित्ररथ #RepublicDay2020 pic.twitter.com/WEtkw5Q3Eq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण” date=”26/01/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण, ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत, राज्यपथावर सैन्यदलाचे शानदार संचलन https://t.co/kGHfDJfyJs #RepublicDayIndia #RepublicDay2020 pic.twitter.com/7vZTemtXZu
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा” date=”26/01/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ]
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #RepublicDay #happyrepublicday #प्रजासत्ताकदिन #हिंदवीस्वराज्य pic.twitter.com/ifkQmIW93g
— Raj Thackeray (@RajThackeray) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण” date=”26/01/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण https://t.co/kGHfDJfyJs #RepublicDayIndia #RepublicDay2020 pic.twitter.com/UO3c3u9z3k
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”लडाखमधील उणे 20 डिग्री तापमानात, 17 हजार फूट उंचीवर आयटीबीपीच्या जवानांचा तिरंग्याला सलाम” date=”26/01/2020,8:35AM” class=”svt-cd-green” ]
Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel with the national flag celebrating #RepublicDay at 17,000 feet today. The temperature in Ladakh at present is minus 20 degrees Celsius. pic.twitter.com/FwnADvE5a2
— ANI (@ANI) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण” date=”26/01/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : मुंबई महापालिकेत संचलन आणि ध्वजारोहण, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/SPu7z6xgpA
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राचा चित्ररथ” date=”26/01/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] देशाचा प्रजाससत्ताक दिन मोठ्या उत्साहात शिवाजी पार्क मैदानावर साजरा केला जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हस्ते ध्वजारोहण केले जाणार असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित असतील. यावर्षी नव्याने मुंबई पोलीस दलात सामील करण्यात आलेल्या अश्वदलाची संचालनाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. अश्वदलाकडून तिरंग्याला मानवंदना दिली जाईल. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची प्रतिकृती चित्ररथाद्वारे दाखवण्यात येणार आहे. हे आजच्या संचालनाचे प्रमुख आकर्षण आहे. शिवाजी महाराजांच्या समुद्रीसीमा बंदिस्ती करण्यासाठी उभारलेल्या आरमाराची प्रतिकृती यावेळी पाहायला मिळणार असून, आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांची यशोगाथा या चित्ररथातून मांडण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=”राजपथावर देशाच्या सामर्थ्याची झलक” date=”26/01/2020,8:18AM” class=”svt-cd-green” ]
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर देशाच्या सामर्थ्याची झलक, वांद्र्यात आदित्य ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण https://t.co/QpqJGqQKAq #RepublicDayIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवार शिवभोजना थाळीचे उद्घाटन करणार” date=”26/01/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार शिवभोजना थाळीचे उद्घाटन करणार, पुणे-पिंपरीत 11 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन मिळणार [/svt-event]
[svt-event title=”देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह” date=”26/01/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, राजपथावर भारताची शस्त्र सज्जता आणि संस्कृतीची झलक, ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो प्रमुख पाहुणे आहेत. [/svt-event]