बाबा रामदेवांच्या ‘कोरोनिल’ला मेडिकल असोसिएनशचा विरोध; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला होता सोहळा

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन पतंजलीच्या औषधाला चुकीच्या पद्धतीने प्रमोट करत आहेत. | Baba Ramdev Patanjali coronil medicine

बाबा रामदेवांच्या 'कोरोनिल'ला मेडिकल असोसिएनशचा विरोध; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला होता सोहळा
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे औषध लाँच केले होते.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 11:27 AM

मुंबई: बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली कंपनीने बाजारपेठेत आणलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला (coronil medicine) इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध करण्यात आला आहे. या औषधाला कुठल्याच यंत्रणांकडून परवानगी मिळाली नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव जयेश लेले यांनी स्पष्ट केले. (Baba Ramdev Patanjali coronil medicine)

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे औषध लाँच केले होते. यावेळी त्यांनी पतंजलीचा वैज्ञानिक रिसर्च पेपरही सादर केला होता. मात्र, जयेश लेले यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन पतंजलीच्या औषधाला चुकीच्या पद्धतीने प्रमोट करत आहेत. या औषधाला डीसीजीआय किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे डॉ. हर्षवर्धन यांची ही कृती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे जयेश लेले यांनी म्हटले आहे.

रामदेव बाबांनी काय म्हटले होते?

आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल कोट्यवधी लोकांना जीवन देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीने म्हटले होते.

भारतातल्या करोडो लोकांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. यामध्ये आपली आधुनिक उपचार पद्धती आणि योग आणि आयुर्वेदाचा फार मोठा वाटा आहे. करोडो लोक आपल्या घरामध्ये राहून काढा पीत होते, योग करत होते. कोरोनाबरोबरच अनेक आजारांवरची औषधं पतंजलीने मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिली आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना

महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोना रुग्णांची (Coivd 19) संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे.

लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. मार्च 2021 पासून सहआजार (को-मॉर्बिडिटी) असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल. त्यासाठी आगामी काळात उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

बाबा रामदेवचं कोरोना औषधही बाजारात, लॉचिंगला गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री!

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी 

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

(Baba Ramdev Patanjali coronil medicine)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.