कोरोनामुळे बंद असलेली मेमू आजपासून पुन्हा सुरु, चाकरमान्यांना दिलासा, एका क्लिकवर वेळापत्रक पाहा

अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली वसई रोड, दिवा, पनवेल ही मेमू आजपासून पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर लाईनला जोडणारी ही मेमू चालू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे बंद असलेली मेमू आजपासून पुन्हा सुरु, चाकरमान्यांना दिलासा, एका क्लिकवर वेळापत्रक पाहा
मेमू ट्रेन
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 11:08 AM

मुंबई : अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली वसई रोड, दिवा, पनवेल ही मेमू आजपासून पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर लाईनला जोडणारी ही मेमू चालू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या गाडीच्या किती फेऱ्या?

मध्यरेल्वेच्या प्रस्तावानुसार दिवा-वसई रोड मेमू गाडीच्या दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. वसई रोड-पनवेल मेमू गाडीच्या रोज 6 फेऱ्या होणार आहेत. तर पनवेल दिवा-वसई रोड मेमूच्या शनिवार व रविवार वगळता दररोज 8 फेऱ्या होणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दररोज तिकीट, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास

कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दररोज तिकीट मिळणार आहे तर दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास मिळणार आहे.

मेमो सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण

ही मेमू चालू झाल्याने प्रवाशांना समाधान मिळाले असून त्यांनीही रेल्वे प्रशासनाने आभार मानले आहेत. पण याच मेमूच्या वेळापत्रकामध्ये बदल करून ऑफिस वेळेनुसार सुरू केली तर आणखी बरे होईल अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

मेमूचे वेळापत्रक

दिवा वसई रोड- सकाळी 5.49 वाजता , 11.30, दुपारी 2.33, सायंकाळी 4.25, 5.55

वसई रोड दिवा- सकाळी 9.50, दुपारी 12.55, दुपारी 3.55, सायंकाळी 5.35, सायंकाळी 7.15

पनवेल दिवा- सकाळी 8.25, 10.30, दुपारी 12.10

दिवा पनवेल- सकाळी 9.25, सकाळी 11.20, सायंकाळी 6.45

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम

राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचं चित्रं आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस स्टॉपवर गर्दी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारने दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून हे सर्व सामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील ठिकाणी बस स्टॉपवर लोकांची मोठी रांग दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासंदर्भात सामान्य मुंबईकरांनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे.

हे ही वाचा :

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही, कारण…

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.