नवी मुंबईत किड्यांचा उच्छाद, अंगावर किडे पडल्याने नागरिक हैराण

रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणात किड्यांचा सुळसुळाट (Insects Attack in Navi mumbai Seawoods Area) झाला आहे.

नवी मुंबईत किड्यांचा उच्छाद, अंगावर किडे पडल्याने नागरिक हैराण
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 5:42 PM

नवी मुंबई : नेरुळमधील सिवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद (Insects Attack in Navi mumbai Seawoods Area) मांडला आहे. या किड्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणात किड्यांचा सुळसुळाट (Insects Attack in Navi mumbai Seawoods Area) झाला आहे. हे किडे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या अंगावर किडे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शरीराला खाज (Insects Attack in Navi mumbai Seawoods Area) येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत दिवसा ऊन आणि रात्री पाऊस पडत आहे. या सततच्या वातावरण बदलामुळे सिवूड परिसरातील झाडं, रस्ते आणि सरंक्षक भिंतीवर किडे पाहायला मिळत आहे. हे किडे वाहनधारक, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पडतात. हे किडे पडल्यानंतर शरीराला विशिष्ट प्रकारची खाज येण्यास सुरुवात होते. तसेच अंगावर लाल डागही दिसू लागतात. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सीवूड परिसरात किड्यांच्या वाढत्या प्रादुभावामुळे लहान मुलांसह मोठ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक दुचाकीस्वारांच्या अंगावर हे किडे पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसरातील लोकांनी, तसेच लोकप्रतिनिधींनी महानगर पालिकेकडे याबाबत तक्रारही केली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी सुरु आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.