13 जणांचे मृत्यूचे खोटे दाखले बनवून दीड कोटी लुटले!

मुंबई : जिवंत लोकांचा खोटा मृत्यूचा दाखला दाखवत विमा कंपनीला गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. डोंबिवलीत तब्बल 13 जिवंत लोकांचा खोटा मृत्यूचा दाखला देत यातून विमा कंपनीकडून जवळपास दीड कोटी लुटल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या […]

13 जणांचे मृत्यूचे खोटे दाखले बनवून दीड कोटी लुटले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : जिवंत लोकांचा खोटा मृत्यूचा दाखला दाखवत विमा कंपनीला गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण पथकाने या प्रकरणाचा छडा लावला. डोंबिवलीत तब्बल 13 जिवंत लोकांचा खोटा मृत्यूचा दाखला देत यातून विमा कंपनीकडून जवळपास दीड कोटी लुटल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आरोपी चंद्रशेखर शिंदे याने त्याचा पुतण्या व्यंकटेश शिंदे हा जिवंत असताना त्याचा खोटा मृत्यूचा दाखला काढत विम्याचे 4 लाख 8 हजार रुपये लाटले. त्यानंतर अशाप्रकारे त्याने त्याची पत्नी, मुलगा, सून आणि इतर मिळून तब्बल 13 जणांचा खोटा मृत्यूचा दाखला काढला. त्याद्वारे त्यांच्या विम्याचे 81 लाख रुपये लाटले. तर आणखी 55 लाख रुपये काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंद्रशेखरचा पुतण्या व्यंकटेश याने गुन्हे शाखेकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघड झाला.

चंद्रशेखर शिंदे सोबत या गुन्ह्यात मुंब्र्याचे दोन एमबीबीएस डॉक्टर आणि मुंब्रा स्मशानभूमीत काम करणारा महापालिकेचा कर्मचारी यांचाही सहभाग होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रशेखर याच्यासह स्मशानभूमीचा कर्मचारी तेजपाल मेहरोल, डॉ. इम्रान सिद्दीकी, डॉ. अब्दुल सिद्दीकी, चंद्रशेखरचा मुलगा नारायण आणि सून लक्ष्मी यांना अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेने सध्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.