हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्ताची बातमी, नव्या मार्गदर्शक सूचना लागू

कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असलेल्या जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली (New Guidelines for international travel )जारी करण्यात आली आहे.

हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्ताची बातमी, नव्या मार्गदर्शक सूचना लागू
International arrival guidelines new guidelines
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:13 AM

मुंबई : कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असलेल्या जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली (New Guidelines for international travel )जारी करण्यात आली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली आज मध्यरात्रीपासून लागू झालीय. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने प्रवाशांसाठी नवी नियमावली काढली आहे. केंद्र सरकारने ज्या देशांना जोखीम असलेल्या श्रेणीत टाकलं आहे.त्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हे नियम लागू असतील. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात एअरपोर्टवर कोरोना चाचणी करावी लागणार आहे. जोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी विमानतळावर केली जाणार आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी आयएनएसओसीओजीच्या प्रयोगशाळेत पाठवले जातील.

प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास कशी प्रक्रिया

जोखमीच्या देशातू आलेला प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्याचे सॅम्पल जिनोम टेस्टिंगसाठी पाठवले जातील. त्याचसोबत प्रोटोकॉलनुसार त्या प्रवाशाला आयसोलेट केले जाईल. चाचणीच्या वेळी प्रवाशामध्ये लक्षण आढळून आल्यास त्याला आयसोलेट केलं जाईल आणि त्याच्यावर हेल्थ प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. जर प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला सात दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागेल आणि आठव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल. पुढील सात दिवस त्या रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जाईल.

जोखीम नसणाऱ्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कशी प्रक्रिया

कोरोना आणि ओमिक्रॉनची जोखीम नसलेल्या देशातून येणाऱ्या काही प्रवाशांची चाचणी विमानतळावर केली जाणार आहे. ज्या प्रवाशांची चाचणी केली जाईल आणि ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. भारतात आलेल्या दिवसापासून आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. प्रवाशांना आठव्या दिवशी एअर सुविधा पोर्टलवर चाचणी अहवाल अपलोड करावा लागले. लहान मुलांची प्री आणि पोस्ट एअर अरायवल चाचणी करण्यामधून सूट देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

अवघा देश स्वतंत्र झाला, त्याच दिवशी या सन्याशाला अटक झाली, मराठवाड्याचे मुक्तीदाते स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन!!

Corona Vaccine : लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस; केंद्राच्या विशेष समितीची मंजुरी

International arrival guidelines new guidelines implemented from today check here sops

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.