Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांचं नाव पोलीस महासंचालकपदी निश्चित झाले आहे (Hemant Nagrale Maharashtra DGP)

Hemant Nagrale | महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:48 AM

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. (IPS Officer Hemant Nagrale becomes Maharashtra DGP full profile)

संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत होती. परंतु नगराळे यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांची कारकीर्द

हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

हेमंत नगराळे आणि वाद

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात तक्रार

नगराळेंच्या कार्यकाळात पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. एका बांधकाम व्यावसायिकाला पुरवण्यात आलेले संरक्षण हेमंत नगराळे यांनी काढून घेतले होते. या प्रकरणी बिल्डरने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर न्यायालयाने नगराळेंना झापलेही होते. (IPS Officer Hemant Nagrale becomes Maharashtra DGP full profile)

महासंचालकपदाच्या शर्यतीत कोण होते?

1) संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड 2) हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान 3) सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग 4) रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांच्या वर्णीची शक्यता

(IPS Officer Hemant Nagrale becomes Maharashtra DGP full profile)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.