दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीची मालमत्ता जप्त, गिरगावातील कोट्यावधीचा भूखंड ईडीच्या ताब्यात

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील पट्ठे बापूराव मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलच्या समोरचा प्लॉट नंबर 998 चा समावेश आहे. ही मालमत्ता मुंबईच्या खेतवाडी परिसरात आहे. या मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे.

दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीची मालमत्ता जप्त, गिरगावातील कोट्यावधीचा भूखंड ईडीच्या ताब्यात
iqbal mirchi
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 9:07 AM

Iqbal Mirchi Property Seized : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्चीविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) इक्बाल मिर्चीची गिरगावातील एक मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ही सर्व जमीन ताब्यात घेतली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणारा दिवंगत इक्बाल मिर्ची याच्या साथीदारांनी एका सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर इक्‍बाल मिर्चीची गिरगावातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीच्या काही साथीदारांनी सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गिरगावातील न्यू रोशन टॉकीजचा भूखंड ताब्यात घेतला. काल सीआरपीएफच्या अनेक जवानांसह ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यानंतर खेतवाडीतील गिरगावमधील हा मोकळा भूखंड ताब्यात घेत सुरक्षित केला.

मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील पट्ठे बापूराव मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलच्या समोरचा प्लॉट नंबर 998 चा समावेश आहे. ही मालमत्ता मुंबईच्या खेतवाडी परिसरात आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ही मालमत्ता तिसऱ्या विकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. इकबाल मिर्ची आणि इतर आरोपींविरुद्ध आयपीसी, आर्म्स ॲक्ट, एनडीपीएस ॲक्ट यांसह अनेक कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच आधारे पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेटाळला दावा

मिर्ची कुटुंबाशी संबंधित एका व्यक्तीने तपास एजन्सीला सांगितले की, सिनेमा हॉल त्याच्या मालकीचा आहे. त्याने मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेतल्यानंतर ही इमारत पाडली होती. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा दावा फेटाळून लावला आणि त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याआधी तपशीलांचा आढावा घेतला आहे.

असा घेतला भूखंड ताब्यात

2019 मध्ये ईडीने मिर्ची आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. यावेळी न्यू रोशन टॉकीजसह अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर ईडीला या मालमत्तेचा ताबा घ्यायचा होता, परंतु मिर्चीच्या नातेवाईकांनी अपीलीय न्यायाधिकरणाकडून त्यावर स्थगिती मिळवली. त्यानंतर हा मुद्दा प्रलंबित ठेवण्यात आला. आता गेल्या महिन्यात इक्बाल मिर्ची याच्या साथीदारांनी एका सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केली होती. तसेच मिर्चीच्या कुटुंबाकडून ही मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकण्याचे प्रयत्न सुरु होती. यानंतर आता तपास यंत्रणेने यावर स्थगिती आणत ती रिकामी करण्यासाठी न्यायाधिकरणाशी संपर्क साधला आणि त्यानंतर भूखंडाचा ताबा घेतला.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.