मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची अखेर बदली झाली आहे. चहल यांना बढती मिळाली असून त्यांची केंद्रात सचिव (Union Secretary) पदावर नियुक्ती करण्यात आलीय. मुंबईत कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर इक्बाल चहल यांची मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आयुक्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना काळात त्यांच्या कामाचं कौतुक झालं. मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी अनेक कठोर पावलं उचलली. मुंबई महापालिकेनं राबवलेल्या धारावी पॅटर्नचं तर जगभरात कौतुक झालं होतं.
इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात वर्णी लागल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. चहल यांनी आपली केंद्रात सचिव पदावर नियुक्ती झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिलीय.
16 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिनाझ मर्चंट लिखित ‘इक्बाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी इक्बालसिंह चहल यांनी हा किस्सा सांगितला होता. आपण कुठेही काम करतो तेव्हा आपला लीडर असतो. संकटात जबाबदारी घ्यायच्या वेळी राजकारणी जबाबदारी झटकताना दिसतात. पण कोरोना संकटात आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी यश आलं तर तुमचं आणि अपयश आलं तर ते माझं राहिल असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे हे बोल माझ्या आत्म्याला लागेल. त्यामुळे मी चांगलं काम करण्याची शपथ घेतली, असं चहल म्हणाले होते.
CM Uddhav Thackeray ji launched the book “Iqbal Singh Chahal- Covid Warrior” today, authored by @MinhazMerchant ji. A must read as it gives a behind the scene perspective of Mumbai’s brave covid fight! pic.twitter.com/Lz9pEsh15f
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 16, 2022
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या इक्बाल चहल यांच्यावर नाराज असल्याचं पाच दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. पेडणेकर यांनी चहल यांना पत्र लिहून आपली नाराजीही व्यक्त केली होती. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांकडून घेण्यात आलेले निर्णय बदलण्यात येत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला होता. मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलीय. चहल हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये प्रशासनाकडून बदल केला जात आहे. हा बदल म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचं पेडणेकर यांनी पत्रात म्हटलं होतं.