दिलासा! कोणतीही करवाढ नाही, प्रत्येक शाळेवर सीसीटीव्हीचा वॉच; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आणखी काय?
मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 6770 कोटींनी वाढला आहे. म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात साडे चौदा टक्क्याची वाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच प्रशासकाने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिकेची निवडणूक कधीही होण्याची शक्यता असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
आरोग्य विभागासाठी काय?
आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च 6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे.
भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी 110 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी 110 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी 95 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामांसाठी 75 कोटींची तरतूक करण्यात आली आहे.
सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी 70 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम करण्यासाठी 28 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नायर दंत महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी 17.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मला:निसरणासाठीची तरतूद
मुंबई मलनिःसारण प्रकल्प (एमएसडीपी)साठी 3566.78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 1376 कोटी
जल अभियंता विभागासाठी 780 कोटी
जलवहन बोगद्यांच्या बांधकामांसाठी 433 कोटी
2000 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या नवीन जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी 350 कोटी
मुंबई मलनिःसारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) 300 कोटी
200 द.ल.लि. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्पाची मनोरी येथे उभारणी करण्यासाठी 200 कोटी
सर्वसाधारण तरतूद
कोस्टल रोडसाठी 3545 कोटींची तरतूद
प्राथमिक शिक्षणाकरीता 3347.13 कोटींची तरतूद
मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी (STP) 2792 कोटी
रस्त्यांच्या सुधारण्यासाठी 2825.06 कोटी
पूलांकरता एकूण तरतूद 2100 कोटी
पर्जन्य जलवाहिन्यांकरिता 2570.65 कोटी
घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 366.50 कोटी
आश्रय योजनेकरीता तरतूद 1125 कोटी
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (GMLR) 1060 कोटी
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण आणि दर्जोन्नतीकरीता 133.93 कोटी
देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता तरतूद 13.69 कोटी
शिक्षण विभागाचा 3 हजार 347.13 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर
खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद
व्हर्च्युअल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद
022 ते 2025 या कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद
नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28.45 कोटींची तरतूद
मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार
शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद