Assembly Speaker Election : मुनगंटीवार म्हणतात ते खरंय का? विधानसभा अध्यक्ष निवडीत व्हीप नसतो? आम्हाला तेही मदत करतील
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची ही संयुक्त बैठक होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. हे लोकांचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. राहुल नार्वकर विजयी होतील, असा विश्वास राम कदम यांनी वर्तविला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर नुकतीच मुंबईतील भाजप आणि शिवसेनेमधील आमदारांची बैठक संपली. भाजप आणि शिवसेना हे डबल इंजीन आहे, असं मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केलं. विधानसभा (Assembly) अध्यक्ष निवडीत व्हीप नसतो. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही मदत करतील, असं मुनगंटीवार म्हणालेत. 170 पेक्षा जास्त मतं आम्हाला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आम्हाला मतं देतील, असंही ते म्हणाले.
हे लोकांचं सरकार – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची ही संयुक्त बैठक होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. हे लोकांचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. राहुल नार्वकर विजयी होतील, असा विश्वास राम कदम यांनी वर्तविला आहे. या सर्व आमदारांचं स्वागत करण्यात आलं. तब्बल अकरा दिवसांनंतर शिंदे गटातील सर्व आमदार सूरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत परतले.
कायदेशीर बाजू मजबूत
भाजप आणि शिवसेनेचं सरकार हे लोकांचं सरकार आहे, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला कसं सामोरं जायचं, याच्या तांत्रिक बाबी या बैठकीत समजावून सांगण्यात आल्या. भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना आश्वस्त केलं गेलं की, सर्व आमदारांच्या मतदारसंघातील अडचणी दूर केल्या जातील. कायदेशीर बाजू योग्य असल्यामुळं भाजप-सेनेचा उमेदवार निवडून येईल, असं मत राहुल कुल यांनी व्यक्त केलं.
सर्वांनी मिळून काम करायचं ठरलं
राज्यसभा, विधान परिषदेत विजय संपादन केला. तसंच उद्याही विजय मिळेल. सरकार स्थिर आहे. बहुमत सिद्ध होईल, असं मत आमदार रवी राणा यांनी दिलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले. नार्वेकर हेसुद्धा यंग आहेत. आज खात्याचा विषय नव्हता, असंही राणा म्हणाले. सर्वांनी मिळून काम करायचं असं ठरल्याचं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.