मोठी बातमी! जे जे रुग्णालयातील 9 वरिष्ठ डॉक्टांराचे तडकाफडकी राजीनामे, नेमकं काय घडलं?

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

मोठी बातमी! जे जे रुग्णालयातील 9 वरिष्ठ डॉक्टांराचे तडकाफडकी राजीनामे, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 7:07 PM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचादेखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.

जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. संबंधित प्रकार हा अतिशय धक्कादायक मानला जातोय. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचं नाव असल्याने हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता आहे. पण दोन्ही बाजूच्या भूमिका समजून घेतल्याशिवाय संबंधित प्रकरणावर निष्कर्ष काढता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

जे जे रुग्णलयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं आहे. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर 8 डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम मांडलाय. सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून 7 लाख रुपये दंड ठोठावला, अस पत्रकात म्हटलंय. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावल जात असून त्यांना भडकवण्यात जे जे च्या डिन सहभागी असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. वरिष्ठ डॉक्टरांनी प्रसिद्ध पत्रक काढत याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

वरिष्ठ डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय, वाचा प्रसिद्धी पत्रक जसंच्या तसं

गेल्या काही दिवसांपासून आपण निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहीलेच असेल. नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देनिहाय उत्तर दिलेलं आहे. 1995 पूर्वी रोज फक्त 30 रुग्ण येणाऱ्या या विभागात आज 300 ते 400 रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने 2008 मध्ये विभागास ‘विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा’ दर्जा दिला. या विभागात महाराष्ट्रभरातून आणि इतर राज्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.

डोळ्यांमधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात उपचारासाठी येतात. या विभागात वेगेवेगळ्या अतिविशोपचार सेवा दिल्या जातात. (उदा – मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल आणि सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ज्ञांमार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी आणि ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ज्ञ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. मागील 28 वर्षात 692 शिबीरे घेऊन 30 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.

2016 मध्येही निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील 12 पैकी 11 डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेसही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला.

आता पुन्हा 22 मे 2023 ला सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डॉक्टरांनी अधिष्ठांकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीचे स्पष्टीकरण डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे मागितले. पण अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत 31 मे ला सेवानिवृत्त होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या वरुन हे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुद्धीने त्रास देण्यासाठी आणि त्यांची बदनामी केली आहे हे सिद्ध होत आहे. या विभागामार्फत डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी इतर कोणाताही अध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पण तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.

सहा महिन्यापूर्वी विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजी झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.

अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार अध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील अध्यापक अपामन सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चूक नसताना विभागातील अध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.

डॉ. लहान हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते आणि सर्व अध्यापक रात्रं-दिवस रुग्णसेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी 7 लाख रुपये दंड लावून रिक्त करण्यास सांगितले. तरिही रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते काम करीत आहेत.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.