जयपूर-मुंबई धावत्या एक्सप्रेसमधील गोळीबार घटनेमध्ये मोठा ट्विस्ट, गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

आरोपी  RPF जवान चेतन सिंह याने गोळीबार केला होता. माणसिक तणावामध्ये त्याने सीनिअर ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली नाही. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जयपूर-मुंबई धावत्या एक्सप्रेसमधील गोळीबार घटनेमध्ये मोठा ट्विस्ट, गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
Chetan Singh
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 5:52 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : जयपूर-मुंबई धावत्या एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता. या संपूर्ण घटनेमुळे मुंबई हादरून गेलेली. आरोपी  RPF जवान चेतन सिंह याने गोळीबार केला होता. माणसिक तणावामध्ये त्याने सीनिअर ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये गोळीबार होण्याआधी नेमकं घडलं होतं याबाबत RPF कॉन्स्टेबल अमेय आचार्यने सविस्तर माहिती दिलीये.

गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

आधी सांगण्यात आलं होतं की चेतन सिंग आणि टीकाराम यांच्यात आधी कोणतंही भांडण झालं नसल्याचं समोर आलं होतं. मात्र आता वेगळीच माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये गोळीबारापूर्वी चेतन सिंह रागाच्या भरात होता त्याचा ASI टीकाराम यांच्याशी वाद झाला होता. आजारी असल्याने चेतनने वलसाडला उतरायचं असल्याचा असा हट्ट चेतन सिंह करत होता मात्र त्याला उतरू दिलं गेलं नाही. मुंबई सेंट्रल कंट्रोल रुमनेही त्याला मुंबईपर्यंत येऊन उपचार घेण्याबद्दल सांगितलं होतं, असं एफआयआरमध्ये नमूद केलेलं आहे.

आपण आजारी असूनही आपले सहकारी आपल्याला ड्युटीवरून रिलिव्ह करत नसल्याच्या रागातूनच चेतन सिंहने फायरिंग केल्याचं FIR मध्ये नमूद केलं आहे. वरिष्ठ ASI टीकाराम यांनी ड्युटीचे काहीच तास शिल्लक असून ते पूर्ण करून मुंबईला उतरून उपचार घे, असं  सांगितलं होतं.  गोळीबार करण्यापूर्वी RPF कॉन्स्टेबल अमेय आचार्य आणि चेतन यांच्यात संवाद झाला होता. समजूत काढण्यासाठी अमेय आचार्यने चेतनला एका स्लीपर डब्यात नेऊन झोपवलं होतं. मात्र तिथे आरोपी चेतन सिंह जास्त वेळ झोपला नाही आणि लगेच उठून स्वतःची रायफल मागू लागला.

अमेय याने चेतनला रायल देणार नाही असं सांगितलं त्यानंतर चेतनचा पारा चढला. त्याने अमेयचा गळा दाबला, घाबरलेल्या अमेयने त्याला स्वत:ची रायफल दिली होती. रायफल बदलल्याच सांगण्यासाठी अमेय पुन्हा चेतनकडे गेला आणि त्याने रायफल पुन्हा बदलून स्वतःची रायफल ताब्यात घेतली. त्यावेळी ASI टीकाराम हे चेतनची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतं, असं FIR मध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, काही वेळानंतर अमेय आचार्य स्लीपर डब्यामध्ये आल्यानंतर त्याला टीसीने फोन करून टीकाराम यांच्यावर फायरिंग झाल्याची माहिती दिली. आता चेतनला ताब्यात घेतलं असून पोलीस चौकशी करत आहेत आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.