Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा फक्त ट्रेलर, पिक्चर थांबवून दाखवा, अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्वीकारली

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान बंगल्याबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली स्कॉर्पियो कार गुरुवार 25 फेब्रुवारीला सापडली होती. (Jaish-Ul-Hind Mukesh Ambani )

हा फक्त ट्रेलर, पिक्चर थांबवून दाखवा, अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक गाडीची जबाबदारी 'जैश उल हिंद'ने स्वीकारली
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 9:08 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ (Jaish-ul-Hind) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम अॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये बिटकॉईनद्वारे पैशांच्या मागणीविषयीही उल्लेख आहे. (Jaish-Ul-Hind claims responsibility of placing explosive outside Mukesh Ambani Antilia House)

काय आहे मेसेज?

“ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तरी सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली, पण काही झालं नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे. तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा, असा मेसेज टेलिग्राम अॅपवर लिहिण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान बंगल्याबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली स्कॉर्पियो कार गुरुवार 25 फेब्रुवारीला सापडली होती. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ही कार 24 फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर पार्क करण्यात आली होती. ही कार त्याआधी 12.30 वाजता हाजी अली जंक्शनला पोहोचली होती. या ठिकाणी ही कार 10 मिनिटे थांबली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Jaish-Ul-Hind claims responsibility of placing explosive outside Mukesh Ambani Antilia House)

जिलेटीनच्या कांड्या सापडल्या

कारमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या. हे जिलेटीन प्रामुख्याने भूसुरुंग स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येतात. या कारमध्ये एक पत्रही मिळालं होतं. त्यात धमकीही देण्यात आली होती. या गाडीवर खोटा नंबर टाकण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला आहे. ही कार चोरून आणल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही कार चोरून आणल्याचं उघडकीस आलं आहे.

तपासात काय उघड झालं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अँटालिया बंगल्याबाहेर एक महिन्यांपर्यंत संदिग्ध व्यक्तींनी रेकी केली होती. तसेच अंबानींच्या ताफ्याचा अनेक वेळा पाठलागही केला होता. या कारमध्ये 20 नंबर प्लेटही आढळून आल्या आहेत. यातील अनेक नंबर्स हे अंबानींच्या ताफ्यातील कारच्या नंबरशी मिळते जुळते आहेत. बंगल्याबाहेर सापडलेल्या कारपाठोपाठ एक इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून याच कारमधून रेकी केली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्या शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कार पार्क करतानाही दिसत आहे. मात्र फेस मास्कमुळे त्याची ओळख पटण्यात अडचणी येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुकेश अंबानींच्या Z+ सिक्युरिटीचे महिन्याचे 20 लाख रुपये कोण भरतं?

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

(Jaish-Ul-Hind claims responsibility of placing explosive outside Mukesh Ambani Antilia House)

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.