Video : सइसे कहतें हैं घर में घुसकर मारना…जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जावून त्यांनाच सुनावलेले खडे बोल
गीतकार जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलेले खडे बोल सोशल मीडियात चर्चेत आहेत. त्यांच्याच भूमीत, त्यांच्याच कार्यक्रमात जावेद अख्तरांनी पाकिस्तानला आरसा दाखवला.
मुंबई : लाहौरमध्ये जाऊन गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला मुंबईवरच्या हल्ल्यावरुन खडे बोल सुनावले. दहशतवादापासून ते एकमेकांबद्दल असणाऱ्या आदरतिथ्याबद्दल जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवलं त्यांची ही मुलाखत सोशल मीडियात चर्चेत आहे. पाहूयात.
गीतकार जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलेले खडे बोल सोशल मीडियात चर्चेत आहेत. त्यांच्याच भूमीत, त्यांच्याच कार्यक्रमात जावेद अख्तरांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. अख्तर बोलत राहिले आणि समोर बसलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनाही वास्तव माहित असल्यामुळे समोरुन एकही विरोधाचा स्वर उमटला नाही.
ठिकाण होतं पाकिस्तानातलं लाहौर शहर निमित्त होतं फैज फेस्टिव्हलचं निमंत्रित पाहुणे होते भारताचे गीतकार जावेद अख्तर. मुलाखतीला सुरुवात झाली.आणि समोरुन एक प्रश्न आला. जावेद अख्तरांच्या या बिनतोड उत्तरानंतर पाकिस्तानात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
काही कट्टरपंथियांनी अख्तरांचा निषेध केला, तर काही पाकिस्तानी लोकांनी जावेद अख्तर यांच्या विधानाला खरंही ठरवलं. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमीनं म्हटलं की जावेद अख्तर यांचं उत्तर म्हणजे सइसे कहतें हैं घर में घुसकर मारना.
भाषा शुद्धी, उर्दुचा आग्रह यावरही जावेद अख्तरांनी एक उदाहरण देत भाषा शुद्धतेचा आग्रह निरर्थक असल्याचं म्हटलं. जावेद अख्तर कोणत्याही धर्माच्या कट्टरतेविरोधात स्पष्टपणे बोलतात. याआधी जेव्हा असदुद्दीनं ओवैसींनी भारत माता की जय म्हणण्यास विरोध केला होता., तेव्हा त्याला जावेद अख्तरांनी राज्यसभेच्या समारोपीय भाषणात दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं.