BIG NEWS | अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?, राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामात आपल्यालाही जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले. त्यांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं.

BIG NEWS | अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?, राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 8:28 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मुंबईत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करा, अशी मागणी केली. तसेच आपल्याला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कुठलीही जबाबदारी द्या, अशीदेखील मागणी त्यांनी पक्षाकडे केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे कडक शब्दांत कान टोचले. तसेच त्यांनी भाकरी बदलायला हवी, असं मत मांडलं. पक्षात नव्या माणसांना संधी द्यायला हवी, असं मत मांडलं. एकाच सेलमध्ये तेच-तेच माणसं असण्यापेक्षा भाकरी फिरवली पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं. त्यांच्या याच वक्तव्याचा दाखला घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी गेल्या 5 वर्षे 1 महिन्यांपासून सांभाळत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांनी आज धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. त्यानंतर जयंत पाटील यांनी भाषणात अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करत भूमिका मांडली. त्यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकं काय सुरुय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार यांनी पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात संघटनेतील कोणत्याही पदाची जबाबदारी आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली. “मला संघटनेत कोणतेही पद द्या. पदाला न्याय देईन”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?

दुसरीकडे जयंत पाटील यांच्याकडे गेल्या 5 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. पक्षाच्या घटनेनुसार प्रत्येकी 3 वर्षात पद बदलण्याची तरतूद आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणात आजही भाकरी फिरवलीच पाहिजे, असं वक्तव्य केलंय. तसेच आपल्याला संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणी केलीय. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर तर दावा केला नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

‘5 वर्ष 1 महिन्यापासून प्रदेशाध्यक्ष’, अजित पवारांचा उल्लेख करत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“आज योगाचा कार्यक्रम झाला, ज्याला अजित पवार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जायचं टाळलं. खरं म्हणजे यांच्यापेक्षा जड असणारी वजनदार माणसं योगा करत असल्याचे फोटो समोर आले आहेत. किमान ते कसे करतात हे बघायला तुम्ही जायला पाहिजे होतं. विरोधी पक्षनेत्याचं हे काम आहे की, सरकारमध्ये बसलेल्यांकडे लक्ष ठेवणं. कोण किती वाकू शकतो, कोण किती वाकू शकत नाही, हे बघण्याचं काम विरोधी पक्षनेत्याचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आपण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करुयात. पक्षाच्या बुथवरचा आग्रह अजित पवार यांनी मगाशी सांगितला. माझी विनंती आहे की, मी गेले 5 वर्ष 1 महिना अध्यक्ष झालेलो आहे. अजित दादांनी माझे महिने मोजलेले आहेत. मी 5 वर्ष 1 महिन्यापासून महाराष्ट्रात काय सांगतोय की बुथ कमिट्या करा. सांगतोय की नाही?”, असं जयंत पाटील म्हणाले.

“एक तास राष्ट्रवादीसाठी द्या, असं गेल्या दोन वर्षापासून सांगतोय. बरेचजण करत आहेत. करत नाही, असं नाही. पण प्रत्येकाने एक तास राष्ट्रवादी आणि बुथ कमिटी हे नक्की पाळा. आपण किती घोषणा केल्या, कितीही भाषणं केली तरी आपली ग्राउंडवर फिल्डिंग नसेल तर काहीच फरक नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

“विधानसभेच्या 2019 मध्ये जिथे आपला विजय झाला तिथे सर्व बुथ कमिट्या चांगल्या केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी काठावर पास झालो तिथेही बुथ कमिट्या चांगल्या होत्या. पण जिथे बुथ कमिट्यांसाठी लक्ष दिलं नाही तिथे 30 ते 40 हजार मतांनी आमचा पराभव झाला. म्हणून माझी विनंती आहे”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

‘अजित दादा तुमच्याकडे आता कुणी काम घेऊन आलं तर…’

“अजित दादा तुमच्याकडे आता कुणी काम घेऊन आलं तर त्याला तू कोणत्या बुथ कमिटीत काम करतो ते सांग, असं म्हणायचं. तुझी बुथ कमिटी कुठली, तुझं गाव कुठलं? एवढं लिहून घ्यायला सुरुवात करा. सगळे बुथ कमिट्या करायला लागतील. बुथ कमिट्या केल्याशिवाय स्वस्थ बसायचा नाही, हा संदेश घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.