Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे (Duplicate Papers) तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आपली अटक  टाळण्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
जयकुमार गोरेंकडून मृत मागासवर्गीय व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्नImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 1:56 AM
मुंबई : आज नेत्यांच्या चौकशीबाबत आणि कोर्ट कचेरीबाबत काही मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. अशातच आता भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) दिलासा मिळालेला नाही गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची लटकती तलवार कायम आहे . मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे (Duplicate Papers) तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आपली अटक  टाळण्यासाठी गोरे यांनी  सुरूवातीला  वडुज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र  न्यायालयाने  तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दोन आठवड्यांची मुदत मागितली

आता मुंबई उच्च न्यायालयानेही  आज गोरे यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला  आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी गोरे यांना दोन आठवड्यांची मुदत दिली गेली आहे त्यामुळे  त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन आठवडे गोरे यांच्यावर अटकेची कारवाई न  करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र गोरे हे लवकरच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यामुळे सेशन कोर्टापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टात तरी गोरे यांना दिलासा मिळणार का ? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठारणार आहे.

प्रकरण काय आहे ?

 जयकुमार गोरे यांच्यावर  दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून गोरे आणि त्यांच्या  चार साथीदारा विरोधात  ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक जो मयत आहे. त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे.  दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकां विरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.