“अंदमानाचा इतिहास काढून टाका आणि मला सावरकर समजून सांगा”; जितेंद्र आव्हाड यानी एकाच वाक्यात विरोधकांना दिलं उत्तर

अफजल खान लाखाचं सैन्य घेऊन आला असला तरी त्याच्याबरोबर लढताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त पाच सैनिकांना घेऊन त्याच्यासमोर गेले होते.

अंदमानाचा इतिहास काढून टाका आणि मला सावरकर समजून सांगा; जितेंद्र आव्हाड यानी एकाच वाक्यात विरोधकांना दिलं उत्तर
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 4:58 PM

मुंबईः आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासातील संदर्भ देत औरंगजेब, अफजलखान, मोघल यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने नवा वाद उखरून काढला आहे. त्यामुळे नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही नाईनवरून आपली भूमिका मांडत, मी जे बोलतो, त्या गोष्टीला संदर्भ असल्याचे सांगत त्यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडताना आपल्या वक्तव्यावर ठाम असताना त्यांनी कृष्णाने सांगितलेली भगवद्गगीता, कर्ण ते अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत त्यांनी उदाहरण देत इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

जी लोकं आपल्या वक्तव्यावर आक्षेप घेतात त्यांनी अंदमानाचा इतिहास बाजूल काढून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजून सांगावा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जितेंद्र आव्हाड सरळ आणि थेट बोलता आणि मी माझ्या मतावर ठाम असतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माझं वक्तव्य 2 हजार टक्के वादग्रस्त नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर लढण्यासाठी अफजल खान 1 लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता.

त्यावेळी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की, माळरानावर युद्धाच्या आमंत्रणासाठी जाऊ नकोस. आणि हे सांगणंच मुळात अतिशय विचार करुन ही रणनीती आखली गेली होती असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना त्यांनी औरंगजेबचे राजकारण आणि त्यांनी आखलेली रणनीती आणि त्याला तोडीस तोड म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखलेली गनिमा काव्याने केलेला त्यांच्याशी सामना कसा होता हेही त्यांनी यावेळी सांगितले.

अफजल खान लाखाचं सैन्य घेऊन आला असला तरी त्याच्याबरोबर लढताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त पाच सैनिकांना घेऊन त्याच्यासमोर गेले होते.

त्या एवढ्या मोठ्आ अफजल खानसमोरही त्यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवत अफजल खान बरोबर ते लढले त्यामुळे शिवाजी महाराज मोठे खऱ्या अर्थाने मोठे ठरले हेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगता सांगता जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अगदी महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दाखल देत. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यातून बाजूला काढले तर त्यांचे काय उरते असा प्रतिसवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....