Aarey Tree Cutting : ‘आरे’ला कारे करणारे एक झालेत, वृक्षतोडीवर जितेंद्र आव्हाडांचा संताप
आरेतील एक झाड सरकारचा एक आमदार पाडेल, या सरकारची हिम्मत होणार नाही एक झाड पाडायची, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad criticizes on aarey tree cutting) म्हणाले.
मुंबई : आरेतील एक झाड सरकारचा एक आमदार पाडेल, त्याशिवाय या सरकारची हिम्मत होणार नाही एक झाड पाडायची, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad criticizes on aarey tree cutting) म्हणाले. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडप्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काल (4 ऑक्टोबर) आरेतील झाडांची कत्तलही सुरु झाली. त्यामुळे स्थानिकांनी झाडे तोडण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी स्थानिकांना ताब्यत घेतलं.
या घटनेवर जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडीओ ट्वीट करत सरकारवर निशाणा (Jitendra Awhad criticizes on aarey tree cutting) साधला. आव्हाडांचा हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#SaveAarey #SaveAareyForest #RetweeetPlease pic.twitter.com/Lx4gGZY0c7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 4, 2019
गेले तीन-चार महिने सगळीकडे आरे आरे करत आहेत. आरेतील झाडं कापण्यावरुन काहीजण आरेला उत्तर कारे म्हणून करत होते. पण आता सगळीकडे झोपारे कुणी बोलायलाच तयार नाही. कालपासून आरेतील झाडं कापण्यास सुरुवात झाली. आरे वाचवण्यासाठी कुणी झाडाला मिठ्या मारणार होते. कुणी एकही झाड तोडू देणार नव्हते. कुठे गेले कारे करणारे, आरेला कारे करणारे सर्व एक झालेत, तुमची आमची फसवणूक होत आहे. त्यामुळे आरेतील एक झाड सरकारचा एक आमदार पाडुया, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
निष्ठुरपणाने मुंबईला जीवंत ठेवणारा आरे आहे. आरे म्हणजे आरे नसून तो बोरिवली नॅशनल पार्कचा भाग आहे. सगळा अट्टाहास आरेमध्ये कशासाठी, इतर ठिकाणी जागा नाही का, असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केला. ही झाडं कापून सरकार पाप करत आहे. झाडं कापल्यामुळे प्रदुषणात वाढ होणार आहे. त्यामुळे तुमच्या माझ्या पुढील पीढीला याचा त्रास होणार आहे, तर काहींना फुप्फुसाचे आजार होणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बंड करुया, असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओतून त्यांनी थेट शिवसेना आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हे सराकर आपली फसवणूक करत आहेत. मेट्रो कार शेडसाठी आरेची जागा का निवडली, असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, काल संध्याकाळपासून अंधारात झाडं कापली जात असल्याचं स्थानिक नागरिकांना कळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांमधील असंतोष पाहायला मिळाला. झाडांच्या कत्तलीवरुन नागरिक इतके संतप्त झाले की घटनास्थळी पोलिसांना बोलवावे लागले. आरेमधील झाडे वाचवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. सध्या आरे कॉलनीतील मोठ्याप्रमाणात पर्यावरण प्रेमींची गर्दी झाली आहे.