मुंबई : शरद पवार गटाचे विधिमंडळातील पक्षाचे प्रदोत जितेंद्र आव्हाड यांनी आज मोठा खुलासा केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. हे पत्र जयंत पाटील यांच्या हातात दिलं गेलं होतं. जयंत पाटील यांनी ते पत्र शरद पवार यांना दिलचं नाही. कारण त्यांना हे माहीत होतं की, शरद पवार यांना वाईट वाटेल. तेव्हा काही आमदारांचं म्हणणं असं होतं की, शरद पवार यांना सोडा. जाऊ द्या त्यांना. त्या आमदाराचं नाव होतं दिलीप बनकर. शरद पवार यांना राहू द्या एकटं. जाऊ या आपण सरकारसोबत. आता सगळं खरं सांगण्याची वेळ आली, असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं. तेव्हा जयंत पाटील माझ्यासमोर ढसाढसा रडले होते, असंही आव्हाड यांनी सांगितलं.
जयंत पाटील यांना मुळातच हे पटत नव्हतं की, शरद पवार यांना एकटं सोडून कसं जायचं. त्या पत्रावर माझीही सही होती. पण, मी जयंत पाटील यांना सांगितलं होतं आपण काही शरद पवार यांना सोडून जाणार नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेल्यानंतर लगेच हे पत्र लिहिलं गेलं होतं. त्यावेळी बहुतेक सर्व आमदारांच्या सह्या होत्या.
अजित पवार यांची दहशत खूप आहे. माझ्यासारखा माणूस त्यांच्यासमोर तळफडायचा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्या असत्या तर सह्या केल्या असत्या. पण, शिवाजी महाराज यांनी म्हटलं या भेटुया. अफजल खानाने घात करण्याचा बेत केला. असं हे झालं. शरद पवार यांना सांगितलं. चर्चा करू. आणि थेट शिंदे-भाजपसोबत अजित पवार गेले. हा सर्व किस्सा आज जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला.
शरद पवार यांना सोडू, असं पत्र काही आमदारांनी जयंत पाटील यांना दिलं होतं. आमदार दिलीप बनकर यांनी दिलेलं पत्र वाचून जयंत पाटील रडले होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही दिवसातच हे पत्र देण्यात आलं होतं, असं आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला.