Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील चाळीतील रहिवाशांची भेट घेतली. Jitendra Awhad visit bdd chawl

शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलोय, जितेंद्र आव्हाडांची मुंबईच्या चाळीतील रहिवाशांसोबत चर्चा
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 10:10 PM

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील चाळीतील रहिवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चाळींच्या विकासासंदर्भात नागरिकांशी चर्चा केली. मी इथे असाच आलो नाही, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलो आहे. चाळीच्या विकासासंदर्भात 1996 च्या पुराव्याची गरज लागणार नाही, असं ते म्हणाले. (Jitendra Awhad visit bdd chawl for problems discuss problems of residents)

रहिवाशांना 10 वर्षानंतरही परवडणार नाही, अस आम्ही करणार नाही. मी बाहेर राहत असलो तरी तुमचा खिसा किती मोठा आहे, याची मला कल्पना आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. चाळींच्या विकासासाठी आम्ही प्रत्येक घर मालकाचं अ‌ॅग्रिमेंट करून घर सोडायला लावू, अ‌ॅग्रिमेंटवर बायकोची सही असायलाच हवी. 25 हजार रुपये भाडं देऊ असं देखी ते म्हणाले. पार्किंग संदर्भत आर्किटेक्टशी बोलून बघू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुन्हा येताना शासननिर्णय जाहीर झाल्याशिवाय मी तुम्हाला भेटायला येणार नाही, असं देखील ते म्हणले.

आमच्या मागण्यांवर मार्ग काढा: राजू वाघमारे

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे देखील यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र,आमच्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आमच्या मागण्या गेल्या 4 वर्षापासून ज्या आहेत त्याच आता आहेत, आमच्या मागण्या ऐकाव्या आणि मार्ग काढावा, असं राजू वाघमारे म्हणाले.

बीडीडी चाळीतील मागण्या खालील प्रकारे

1. आधी करार नंतर पुर्नविकास ( झोपडपट्टी वासियांना कायमस्वरूपी करार दिला जातो तो करार बीडीडी मध्ये देण्यात यावा )

2. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांना अपात्र केल आहे त्यांना अजून पात्र केल गेल नाही. यामध्ये नायगाव,वरळी,ना.म.जोशी मार्ग येथील रहिवाशी आहेत.

3. PWD ने सर्वेक्षन करावं ही मागणी गेल्या 7 वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र PWD ला सर्वेक्षण करू देण्यास परवानगी देण्यात आली नाही.

4. 10 वर्षाचा मेन्टेंस आम्हाला माफ करण्यात आला पाहीजे.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?

पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले ? पुढचे नियोजन काय ?

(Jitendra Awhad visit bdd chawl for problems discuss problems of residents)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.