आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेत नोकरीची संधी, एक मुलाखत आणि मुंबई महापालिकेत नोकरी पक्की

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 68 जागांवर कंत्राटी तत्त्वावर भरण्याची प्रक्रिया होणार आहे. यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेत नोकरीची संधी, एक मुलाखत आणि मुंबई महापालिकेत नोकरी पक्की
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:34 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 उपनगरीय रुग्णालयांमध्ये अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा-सुविधा देता याव्यात यासाठी डॉक्टरांची 68 पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी येत्या शुक्रवारी व शनिवारी ‘वॉक ईन इंटरव्ह्यू’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात सकाळी 9 ते दुपारी 1 या दरम्यान या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींद्वारे वरिष्ठ सल्लागार स्तरावरील 32 पदे, तर कनिष्ठ सल्लागार स्तरावरील 36 पदे; अशी एकूण 68 पदे भरली जाणार आहेत (Job opportunity in BMC for the post of Doctors in Mumbai amid Corona).

बीएमसीच्या या वैद्यकीय पदांमध्ये भेषज्य (Medicine), शल्यचिकित्सा (Surgery), स्त्रीरोग तज्ज्ञ (Obst. & Gyn.), बालरोग तज्ज्ञ (Pediatrics), अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedics), भूल तज्ज्ञ (Anaesthesia), विकिरण तज्ज्ञ (Radiology), कान-नाक-घसा तज्ज्ञ (E.N.T.), नेत्र तज्ज्ञ (Ophthalmology), रोगनिदान तज्ज्ञ (Pathology) इत्यादी वैद्यकीय विद्या शाखांशी संबंधित विविध 68 पदांचा समावेश आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

निवड होण्यासाठी पात्रता काय?

वरील शाखांमध्ये कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा अर्जदाराकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता असावी. याशिवाय किमान 5 वर्षांचा कार्यानुभव असणे गरजेचे आहे. वरिष्ठ सल्लागार पदासाठीची शैक्षणिक पात्रता देखील एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी आहे. कार्यानुभव मात्र 8 वर्षांचा असणे गरजेचे आहे. तसेच वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तिने किमान 3 संशोधन विषयक कामे केलेली असावीत. दुसरीकडे कनिष्ठ सल्लागार पदासाठी किमान 2 संशोधन विषयक कामे आवश्यक आहेत. तसेच अर्जदाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती?

निवड होणाऱ्या वरिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये 2 लाख, तर कनिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये 1 लाख 50 हजार रुपये इतके ढोबळ मानधन देण्यात येणार आहे.

मुलाखतीला येताना कोणती कागदपत्रे सोबत असावीत?

‘वॉक ईन इंटरव्ह्यू’साठी येताना अर्जदाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, नाव बदलले असल्यास संबंधित कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात. अर्जदाराने साध्या कागदावर संबंधित सर्व तपशील नमूद करुन व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडून अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी शुल्क रुपये 2 हजार इतके असणार आहे. तसेच अर्जदाराने मुलाखतीसाठी स्व-खर्चाने उपस्थित राहावयाचे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची निवड कोठे होणार?

‘वॉक ईन इंटरव्ह्यू’द्वारे निवड होणाऱ्या उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावरील नेमणूक ही महानगरपालिकेच्या उपनगरीय स्तरावरील 6 सर्वोपचार रुग्णालयांमध्ये करण्यात येईल. यामध्ये वांद्रे (पश्चिम) परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालय, कुर्ला परिसरातील खान बहादूर भाभा रुग्णालय, सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय, गोवंडी (पूर्व) परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर (पूर्व) परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा रुग्णालय (राजावाडी रुग्णालय) या 6 सर्वोपचार रुग्णालयांचा समावेश आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.

हेही वाचा :

‘या’ सरकारी कंपनीत मॅनेजर पदांची भरती, 23 एप्रिलपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

MMDR Act: मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऱोजगाराची चिंता मिटणार

MES Recruitment 2021 : ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

व्हिडीओ पाहा :

Job opportunity in BMC for the post of Doctors in Mumbai amid Corona

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.