Mumbai crime : अश्लील फोटो आणि संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटायचा, बोरिवलीत पोलिसांनी रंगेहात पकडलं
बोरिवलीतील एका महिलेने तिच्या हाऊसिंग सोसायटीतील काही रहिवाशांना टार्गेट करण्यासाठी लैंगिक अत्याचार प्रकरणात फेसबुक डिस्प्ले पिक्चर म्हणून तिच्या फोटोचा गैरवापर केला जात असल्याचे कळल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला.
मुंबई : महिला म्हणून फेसबुकवरून संपर्क करणाऱ्या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी अनेक जणांना फसवल्याचा (Cheated) प्रकार घडला आहे. बोरिवलीतील एका आलिशान गृहसंकुलातील डझनभर रहिवासी या फसवणुकीला बळी पडले आहेत. महिला म्हणून फेसबुकवर संपर्क केला जात होता. त्याचबरोबर अश्लील फोटो पाठवून आणि संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल (Viral) करण्याची धमकी देऊन हे प्रकार करण्यात आले. दरम्यान, आरोपी हा त्याच इमारतीत राहणारा असून तो बेरोजगार असल्याने लवकर पैसे कमावण्याच्या हेतूने हे केल्याचे पोलीस तपासात (Police investigation) निष्पन्न झाले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड म्हणाले, की दोन महिन्यांपासून रहिवाशांना त्रास दिला जात होता, परंतु ते आतापर्यंत आमच्याकडे येण्यास घाबरत होते. दरम्यान, या बेरोजगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओढायचा जाळ्यात
मे महिन्यात एका 52 वर्षीय रहिवाशाला एका अकाउंटवरून फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यात त्याच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेचा फोटो होता. त्यांनी रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. त्यानंतर संभाषण सुरू झाले. फेसबुकवरील त्या महिलेने त्याला विचारले, की तो कसा आहे आणि तो कॉम्प्लेक्समध्ये सहसा दिसत नाही. जसजसे दिवस गेले, तिने त्याला प्रायव्हेट मेसेज आणि फोटो पाठवण्यास सुरुवात केली आणि नंतर पैसे न दिल्यास हे स्क्रीनशॉट त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून त्याने 12 हजार रुपये दिले. त्याच अकाऊंटवरून आणखी काही 10-12 जणांना फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आणि अशाच पद्धतीने त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले.
फोटोचा गैरवापर केल्याने महिलेची पोलिसांत धाव
बोरिवलीतील एका महिलेने तिच्या हाऊसिंग सोसायटीतील काही रहिवाशांना टार्गेट करण्यासाठी लैंगिक अत्याचार प्रकरणात फेसबुक डिस्प्ले पिक्चर म्हणून तिच्या फोटोचा गैरवापर केला जात असल्याचे कळल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. फसवणूक झालेल्यांपैकी एक 52 वर्षांचा माणूस होता. 30 जुलै रोजी आधीच पैसे भरलेल्या रहिवाशांना आणखी 10,000 रुपये न दिल्यास आपल्या मुलाचे नुकसान होईल, अशी भयंकर धमकी देण्यात आली. यादरम्यान, महिलेला तिच्या शेजाऱ्यांनी सावध केले आणि फेसबुकवरील अश्लील संभाषण दाखवले. तिने 52 वर्षीय व्यक्तीसह पोलिसांकडे संपर्क साधला आणि एफआयआर दाखल करण्यात आला.
सापळा अन् रंगेहात अटक
आम्ही एक सापळा लावला, जिथे आरोपीला पैसे घ्यायचे होते. आमच्या अधिकार्यांनी गाडीच्या मागच्या चाकाखाली एक लिफाफा ठेवला होता. त्याला ते उचलण्याचे आमिष दाखवले होते. त्याला रंगेहात पकडण्यात आले आणि त्याची ओळख सुशांत तळशीलकर (वय 29) असे होते. खंडणी आणि आयटी कायद्यातील तरतुदींच्या आरोपाखाली रविवारी त्याला अटक करण्यात आली, असे आव्हाड यांनी सांगितले.