मुंबईकरांचा प्रवास होणार आता अधिक सुकर; 500 पेक्षा अधिक रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात, मंत्री आदित्य ठाकरेंनी केली कामाची पहाणी
मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुकर होणार आहे. सध्या शहरात एकूण 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. नुकतीच मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या या कामांची पहाणी केली.
मुंबई : मुंबईकरांना महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) माध्यमातून दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या रस्त्यांची पहाणी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून मध्यरात्री करण्यात आली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामांची माहिती देखील घेतली. मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 295 रस्त्यांची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. उर्वरित 210 रस्त्यांची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. हे सर्व रस्ते बांधून पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. तसेच वाहतूककोंडीची समस्या देखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या अखत्यारीत 2 हजार किमीचे रस्ते
मुंबई महापालिकेच्या अंडरमध्ये सद्यास्थितीत सुमारे 2 हजार किलोमिटरचे रस्ते आहेत. या रस्त्याची देखभाल तसेच नवीन रस्ते निर्मितीची कामे महापालिकेच्या संबंधित समितीमार्फत करण्यात येतात. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी या वर्षीपासून आता रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांना त्याचे लाईव्ह प्रक्षेपण रस्ते विभागाकडे करावे लागणार आहे. यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी तीन ते सहा वर्ष त्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदारांची असणार आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून रस्त्यांची पहाणी
मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांची वाहतूककोंडीतून सूटका व्हावी यासाठी सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात 505 रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यातील 295 रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित 210 रस्त्यांची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासाठी 2210.9 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावीत आहे. दरम्यान काल मध्यरात्री पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांच्या बांधकामाची पहाणी केली, तसेच त्यांच्याकडून रस्त्यांच्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला.