मतलब के हैं यार मगर, दिल के सब…; विधानसभेत काँग्रेस आमदाराची शेरोशायरी
Kailas Gorantyal Sheroshayari in Vidhansabha : विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आमदार विधानसभा आणि विधान परिषदेत विविध मुद्दे उपस्थित करत असतात. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेत बोलताना शेरोशायरी केली. वाचा सविस्तर...
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधिमंडळातील मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी विधानसभेत आज शेरोशायरी केल्याचं कैलास गोरंट्याल म्हणाले. जेवणाच्या पॅकेटमध्ये साप सापडत आहेत. घोणस साप पकडायला हवेत. लोकांचा, जनावरांचा मृत्यू होतोय. सरकारने सर्पमित्रांचा इन्श्युरन्स करावा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलले मी दालनात बैठक घेतो. मी म्हणालो साप घेऊन येतो. मला शायरी बोलायला सांगितलं आणि मी ऐकवली. मतलब के हैं यार मगर दिल के सब काले हैं… नौका मिलते ही यहां सब डसने वाले हैं, किसमे कितना जहर हैं , हमही को पता हैं, इनसे ज्यादा साप हमने पाले हैं…., असं कैलास गोरंट्याल म्हणाले.
नवाब मलिकांबाबत काय म्हणाले?
विधानसभेत आज आमदारांच्या नावापुढे आईचं नाव लावा, ही मागणी केली गेली. केवळ मंत्रीच नाही तर आमदारांनीही आईचं नाव लावायला हवं यावर चर्चा झाल्याचंही कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं. नवाब मलिकला कळालं पाहिजे की ज्या भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांना पाठिंबा दिला नाही, ऊगाच मागे खा फिरायचं, असाच आरोप प्रफुल्ल पटेलवर होता, त्याला मदत केली त्याला राज्यसभा दिली, असं गोरंट्याल म्हणाले.
गोरंट्याल यांची शेरोशायरी
जिंदगी भर मैं ये भूल करता रहा… धूल आईने पर थी और मैं मुंह पोछता रहा… अशी नवाब मलिकची अवस्था… नवाब मलिक अग्नीवीर होणार आहे. अशी अवस्था करून घेण्यापेक्षा, अपमान करून घेण्यापेक्षा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. अजित पवार भाजपसोबत गेले म्हणून लोकसभेत फटका बसला. यापेक्षा जास्त वाईट हाल विधानसभेत होतील, असं गोरंट्याल म्हणाले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत जास्त धोखा भाजपला आहे. भाजप त्यांचा उमेदवार कमी करणार आहे. पाच तारखेनंतर यावर बोलू. आम्ही कॅलक्युलेटेड पक्ष आहोत. भाजपला ओवर कॉन्फिडंस आहे. जर निवडणुक झाली तर भाजपचा एक उमेदवार हरणार आहे. शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत. विधिमंडळात ते बोलत नाहीत. कोट शिवले पण मंत्री केलं नाही… बघा काय होतंय ते…, असं कैलास गोरंट्याल टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.