कलबुर्गीच्या दहावीच्या विद्यार्थीने बनवले Anti-rape footwear

या अनोख्या फुटवेअरमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने नातेवाईकांना संदेश जाऊन आपले ठिकाण कळण्यास मदत होईल असे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे. विजयलक्ष्मी सातवीत असल्यापासून या प्रकल्पावर काम करीत होती.

कलबुर्गीच्या दहावीच्या विद्यार्थीने बनवले Anti-rape footwear
anti-rape footwearImage Credit source: anti-rape footwear
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 1:38 PM

बेळगाव : कर्नाटकातील कलबुर्गीच्या ( Kalburgi ) दहावीत शिकणाऱ्यांना एका शाळकरी विद्यार्थीनीने महिलांच्या सुरक्षेसाठी अनोखे (Anti-rape footwear ) उपकरण तयार केले आहे. तिने अशा प्रकारच्या चपला तयार केल्या आहेत, ज्यामुळे हल्लेखाेरापासून महिलांना स्वत:चा बचाव करता येणार आहे.

लैंगिकविकृतांपासून महिलांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या चप्पलांची तिने निर्मिती केली आहे. या चपला घालून महिलांना आता बिनधास्तपणे घराबाहेर पडता येणार आहे. या चप्पलामध्ये करंट तयार होत असून त्यामुळे हल्लेखोराला लाथ मारताच त्यातून तयार झालेला करंट हल्लेखाेर गोंधळ जाऊन निष्क्रीय होईल असे तिने म्हटले आहे.

महीलांना स्वसंरक्षण करताना या आधुनिक तंत्राची मदत मिळणार आहे. कलबुर्गीच्या दहावीत शिकणाऱ्या विजयलक्ष्मी बिरादर या विद्यार्थीने या अनोख्या फूटवेअरची निर्मिती केली आहे. विजयलक्ष्मी बिरादर हीला अलिकडेच गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल इन्वेशन अॅण्ड इनोव्हेंशन एक्स्पो अवार्डमध्ये  गौरवण्यातही आले आहे.

विजयलक्ष्मी बिरादर हीने विकसित केलेल्या या अॅण्टी रेप फुटवेअरमध्ये बॅटरींचा वापर केला आहे. त्यामुळे हल्लेखोराशी प्रतिकार करताना या चपलांचा फायदा होणार आहे. यातून बाहेर पडणाऱ्या विद्युत लहरींमुळे हल्लेखोराला करंट बसेल. तसेच या फुटवेअरमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्याने नातेवाईकांना संदेश जाऊन ठिकाण कळण्यास मदत होईल असे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे. विजयलक्ष्मी सातवीत असल्यापासून या प्रकल्पावर काम करीत होती.

बाजारात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपकरणे आली आहेत. स्मार्ट वॉचेस, बेल्ट सारखी उपकरणांचा समावेश आहे. परंतू या वस्तू तुम्ही घरी विसरण्याची जास्त शक्यता असते. परंतू चपला तर तुम्हाला घरातून बाहेर पडताना घालाव्या लागतातच त्यामुळे हे डिव्हाईस अधिक उपयोगाचे असल्याचे विजयलक्ष्मी हीचे म्हणणे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.