तरुणांनो तुम्हीही ‘हा’ नाद करु नका, अन्यथा तुमच्यावरही येईल ‘ही’ वेळ
आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून मोहने,आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागातील आठ गुन्हे उघडकीस आणत 47 तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल, महागडी घड्याळं असा 20 लाखपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात चोऱ्यांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेक उच्चभ्रू वस्तीत घर फोडण्याचे प्रकार घडले असून लाखो रुपयांचा ऐवज अनेक कुटुंबीयांचा लंपास करण्यात आला आहे. तर आज एका चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. लाखो रुपयांचे सोने आणि काही महागड्या वस्तूसह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खडकपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता तो उच्च शिक्षित असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र तो चोरी का करतो हे विचारल्यानंतर त्याने दिलेल्या उत्तरावरून मात्र पोलीस चक्रावले आहेत.
खडकपाडा पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण उच्च शिक्षित असूनही तो चोरी का करतो याची माहिती विचारल्यानंतर हौसमौज करण्यासाठी ही चोरी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डान्सबारमध्ये पैसे उधळण्याची सवय लागल्याने ही हौस पूर्ण करण्यासाठी एक उच्चशिक्षित तरुणाने दिवसाढवळ्या घरफोडी करण्याकडे वळाला होता. कल्याण परिसरात दिवसा घरफोडी करणाऱ्या या सराईत चोरट्यास कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने 48 तासात बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे रोशन जाधव असे या आरोपीचे नाव आहे. हा तरुण डोंबिवलीतील निळजे गाव येथे राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारितीचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण 8 गुन्हे उघडकीस आणत 47 तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल, फोन, दोन घड्याळ असा 20 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कल्याणमध्ये भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच मोहने परिसरात एका चोरट्याने घरफोडी करत तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
मात्र ज्या इमारतीमध्ये चोऱ्या झाल्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांसमोर या चोरट्याचा शोध कसा घ्यावा हे मोठं आव्हान होतं. मात्र या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा शोध सुरू केला.
खडकपाडा पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक फुटेजच्या आधारे अखेर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रोशन जाधव नावाच्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून मोहने,आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागातील आठ गुन्हे उघडकीस आणत 47 तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल, महागडी घड्याळं असा 20 लाखपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार रोशन जाधव हा तीन वर्ष एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात काम करत होता. याच दरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला होता. त्यासाठी त्याला पैशांची कमतरता भासू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला.
रोशन आपलं घरदार सोडून स्टेशन परिसरात एका लॉजमध्ये राहत होता. त्यानंतर तो दिवसा सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतीची पाहणी करायचा व त्यानंतर त्या इमारतीत शिरून स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने दरवाजा तोडत तो घरफोडी करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो घरफोड्या करत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.