वाहतूक पोलिसांनी केली दुचाकी टो…मग चालकाने असे काही केले की पोलिसांना सोडून द्यावे लागले

वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्यानंतर काही झालेले नाही, या पद्धतीने त्याची गाडी घेऊन घरी गेला. हा सर्व प्रकार कल्याणममध्ये घडले.

वाहतूक पोलिसांनी केली दुचाकी टो...मग चालकाने असे काही केले की पोलिसांना सोडून द्यावे लागले
कल्याणमध्ये गाडी टो केल्यामुळे पोलिसांच्या गाडीखाली झोपलेला वाहनधारक
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:16 AM

रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई केली जाते. ही कारवाई केल्यानंतर संबंधित वाहन धारक दंड भरून आपले वाहन सोडवून घेतात. परंतु कल्याण वाहतूक पोलिसांना वेगळाच अनुभव आला. पोलिसांच्या संपूर्ण कारकिर्दीत असा आलेला हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. वाहन धारकाने त्याची दुचाकी टो केल्याने संताप व्यक्त केला. भर रस्त्यात गाडी खाली झोपून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली. त्याची दुचाकी सोडून द्यावी लागली. कल्याणच्या खडकपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

नेमके काय झाले

कल्याणच्या खडकपाडा परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरु केली. त्या वाहन चालकाची गाडी टोईंग केली. पोलिसांनी आपली गाडी टोईंग केल्यामुळे वाहन चालक संतप्त झाला. पोलिसांकडून गाडी सोडवण्यासाठी संतप्त चालकाने अनोखी शक्कल लढवली. तो चक्क पोलिसांच्या गाडी खालीच झोपला. तब्बल अर्धा तास तो गाडी खाली झोपून होता.

गाडी टो केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या व्हॅनखाली झोपलेला व्यक्ती पोलिसांनी गाडी देताच निघून गेला.

अखेर पोलिसांनी सोडली गाडी

आपली गाडी रोलिंग व्हॅनवरनं खाली उतरणार नसेल तर माझ्या अंगावरून ही गाडी घेऊन जा, असे सांगत चालकाने विरोध केला. वाहन चालकाचा भर रस्त्यावर हा गोंधळ सुरु होता. घटनास्थळी चांगली गर्दी निर्माण झाली होती. त्याचवेळी वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढता येत नव्हती. वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्यानंतर काही झालेले नाही, या पद्धतीने त्याची गाडी घेऊन घरी गेला.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण पश्चिमेमधील खडकपाडा भागात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार एकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.