मुंबई : रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. कांदिवली स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. ट्रकची मागील बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. सुदैवाने या अपघातत कुणालाही दुखापत झाली नाही. (Kandivali Train Collides With Truck) वांद्रे-अमृतसर या रेल्वेला दुपारी साडेबाराच्या सुमारास हा किरकोळ अपघात झाला.
पश्चिम रेल्वेमार्गावरील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचं काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक मालवाहतूक केली जाते. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास, आलेल्या रेल्वेने, या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या मागील बाजूचं नुकसान झालं आहे. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेल्याने दुभाजकाच्या बॅरिकेट्स तोडून, ट्रक पुढे गेला. (Kandivali Train Collides With Truck)
सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे घटनास्थळी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत, आवश्यक उपाययोजना केल्या.
दरम्यान, रेल्वे लाईनचं काम सुरु असताना, रेल्वेमार्गावर ट्रक कसा आला, यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा आहे का, याबाबत आता तपास सुरु आहे.