करायला जातो एक नि होतं एक, सुप्रिया सुळे यांनी मनसेला अर्थशास्त्राची थेअरीचं सांगितली
राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र यावं.
मुंबई – मनसेनं भोंगे लावा अस आवाहन केलं. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थशास्त्रात एक थेअर आहे. करायला जातो एक आणि होत एक. अनइंटेशनल कान्स्टिक्युएन्सी. राज ठाकरे यांनी मागे खूप मोठं आंदोलन छेडलं होतं. तेव्हा सगळ्यात मोठं नुकसान हे शिर्डीच्या देवस्थानाचं झालं होतं. शिर्डीची काकडआरती बंद झाली होती. साईबाबा हे कुठल्या एका समाजाचे नाहीत. त्यामुळं तेव्हा तिथल्या नागरिकांनी विनंती केली होती की, पुन्हा भोंगे सुरू करा. त्यामुळं अर्थशास्त्रातली थेअरी याला लागू होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, रिक्षा हे मोठं साधन आहे. पुण्यात आज आंदोलन केलं. बाबा आढाव यांनी सहभाग घेतला. राज्य सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. राज्याच्या ईडी सरकारनं यातून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकलं. राष्ट्रवादीनं भूमिका घेतली. पण, भाजप कोश्यारी यांची पाठराखणं करते आहे, याचा मी निषेध करते. राज्याच्या मानसन्मानासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र यावं. राज्याच्या राजकारणाची पातळी घसरते आहे. अनेक वेळा आपण सर्व जण एकत्र यावं. यात कुठंतरी सुसंस्कृतपणा आणावा, अशी इच्छा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात गेल्यास कळेल की, शेतकऱ्याला हमीभाव वेळेवर मिळत नाही. अनेकवेळा शेतकऱ्यांच्या वेदना मांडता. टीव्ही आणि वास्तविकतेची जाणीव करून द्यावी. वीज कापतात, हे अतिशय चुकीचं आहे. अशी वीज तोडू नका, मध्य प्रदेशचं मॉडलं आणा, असं केलं होतं. त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पीक विमा याबद्दल चर्चा झाली पाहिजे. केंद्र सरकारला विनंती राहील. विमा वाढावा तसेच एलआयसी कंपनीचं खासगीकरण थांबावं, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.