Ajit Pawar | अजित पवारांनी थोपटले दंड, लोकसभेसाठी बारामतीसोबत ‘या’ जागाही लढवणार

कर्जतमधील शिबीरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत आणि लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघासह चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे.

Ajit Pawar | अजित पवारांनी थोपटले दंड, लोकसभेसाठी बारामतीसोबत 'या' जागाही लढवणार
Ajit PawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 1:11 PM

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता लोकसभेसाठी सर्व पक्ष तयारीला लागल्याचं दिसत आहे. अजित पवार यांनी कर्जतमधील शिबीरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत आणि लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघासह चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. समान नागरी कायद्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल. सातारा, शिरूर, बारामती, रायगड जागा लढवायच्या आहेत. जागावाटपाबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे. केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप होतो पण आरोप सिद्ध व्हावे लागतात. विकासकामांची गती रेंगाळल्याने भाजपसोबत गेलो होतो. आता मंत्रालयात भेटीसाठी जिल्हाध्यक्षांनाही प्राधान्य देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मी 32 वर्ष राजकारणात काम करीत आहे. आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो. डीपीडिसी संदर्भात माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही. मंत्री,खासदार आणि आमदार आणि आता जिल्ह्याध्यक्षांना आता माझ्याकडे कामाची संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी युवतीमध्ये मतभेद आहेत, ते दूर करण्याची गरज आहे. भाजपबद्दल याआधी वेगळं बोललं जातं होतं, त्यामुळे आपनही अंतर ठेवून काम करत होतो. मात्र आता काळ बदलला, आपणही सेक्युलर आहोत आपली भूमिका बदलली नाही. एकापक्षाचे सरकार नसताना सर्वांचा विचार करावा लागतो. काही वेळेस काही निर्णय घ्यावे लागतात, आपला मूळ पक्ष आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, समान नागरी कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत. मी तुम्हाला सांगतो की,  समान नागरी कायद्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. भाजपसोबत जे गेले त्यांची भूमिक बदलली का? असा सवाल करत अजित पवार यांनी मेहबुबा मुफ्ती आणि नितीश कुमार यांची नावं घेतलीत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.