हे काय तुमच्या बापाचं आहे का..?; जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज ते जत मागतील, उद्या…
सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ते तुमच्या बापाचे आहे का असाच सवाल त्यांनी केला आहे.
मुंबईः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मोठ इतिहास राज्याला असताना, तो इतिहास आताची पिढी विसरते की काय अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीस गावांवर त्यांनी दावा केल्यानंतर राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जत तालुका त्यांच्या बापाचा आहे असा थेट सवालच केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जत तालुक्यातील चाळीस गावांविषयी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, आताच्या पिढी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास विसरते की काय अशी आता भीती वाटू लागली आहे असा अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह येथील परिसर महाराष्ट्रात आणण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष चालू आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 1946 मध्ये ग.त्र्यं. माडखोलकर यांनी संय़ुक्त महाराष्ट्राचा ठराव साहित्य संमेलनात पास केल्या तेव्हापासून डांगसह मुंबई शहरासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून हा संघर्ष चालू आहे.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळीला मोठी इतिहास आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्राची मागणी होत असतानाच बेळगावसह निपाणी, कारवार, बिदर, भालकी या गावांचा प्रश्न सुटवा म्हणून प्रयत्न केला जात आहे. मुंबईसह डांगही महाराष्ट्रात यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.
1946 पासून ते अगदी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हापासून हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जत तालुक्यातील चाळीस गावं कर्नाटकात समावेश करावा यासाठी विचार केला जात आहे, त्यामुळे आज त्यांनी जत मागितले उद्या ते मुंबईही मागायला कमी करणार नाहीत. कारण मुंबईमध्ये अनेक जणांचा जीव अडकला असल्याचेही त्यांनी सांगितले.