नव्या काँक्रीटच्या चकाचक रस्त्याची बदलापुरकरांना भेट, वाहतूक कोंडीतून सुटका

प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विकास आराखड्यानुसार या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. भविष्यात मेट्रो मार्गिका - 14 ची या भागाशी जोडणी लक्षात घेता या रस्त्त्यालगत 40 एकर जागा कारशेडसाठी राखीव ठेवण्यात आली आहे अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर.श्रीनिवास यांनी दिली.

नव्या काँक्रीटच्या चकाचक रस्त्याची बदलापुरकरांना भेट, वाहतूक कोंडीतून सुटका
katrapImage Credit source: https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/12/10230256/katrap1.jpg
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 5:49 PM
मुंबई : नगरपालिका हद्दीतील कात्रप पेट्रोल पंप ते खरवई बाह्यवळण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. याठिकाणी आता एमएमआरडीएने (MMRDA ) काँक्रीटचे रस्ते बांधले आहेत. याठिकाणी मुंबई (MUMBAI ) पायाभूत सुविधा असल्याने अलीकडे येथे गृहसंकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई ते पुण्याला हे रस्ते आणि रेल्वेने चांगल्याप्रकारे जोडले जाणार आहेत.
अलिकडच्या दशकात कुळगाव – बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात विकसित झालेल्या पायाभूत सुविधा तसेच परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेमुळे येथील शहरीकरण वाढले आहे. कुळगाव -बदलापूरात भविष्यात मेट्रोची जोडणी देखील मिळणार असल्यामुळे सामान्य नागरीक स्थायिक होण्यासाठी बदलापूरला प्राधान्य देत आहेत.
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे रहदारीत वाढ होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यासाठी प्राधिकरणामार्फत विस्तारित मुंबई नगरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत  3+3 मार्गिका असलेल्या 3.61 कि.मी.च्या रस्त्याचे बांधकाम बांधण्यात आले आहे.
हा 30 मी. रुंद मार्ग संपूर्ण काँक्रीटचा केल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांपासून सुटका होणार आहे. तसेच राज्य महामार्ग 43 आणि राज्य महामार्ग 76  मार्गे मुंबई- पुणे जोडला जाणार असल्यामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या तसेच पादचारी मार्ग बांधण्यात आला आहे. तसेच सदर प्रकल्पात 5 मो-यांचा समावेश केला आहे.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.