LIVE : डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, मृतांचा आकडा वाढताच
मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली जवळपास 40 ते 50 जण अडकल्याची भीती आहे.
मुंबई: मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळली. यामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकून असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफकडून बचावकार्य रात्रीही सुरुच आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र डॉक्टरांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार रात्री दहापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्ग्याजवळची केसरबाई ही ग्राऊंड फ्लोअर अधिक 4 मजली इमारत होती. ती सकाळी 11 च्या सुमारास कोसळली. इमारात कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने ढिगारा उपसण्याचं काम सुरु करण्यात आलं. मात्र नेमके किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले याची अधिकृत माहितीच नाही. दुपारी 12 वाजताच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेली इमारत ही म्हाडाची असल्याची माहिती स्वत: मुंबई महापालिकेने दिली आहे.
डोंगरी भाग अत्यंत दाटीवाटीचा आहे. सकाळी 11.40 च्या सुमारास डोंगरीतील तांडेल रोडवरील अब्दुल हमिद दर्गा परिसरातील केसरबाई इमारत कोसळली. यानंतर तातडीने एनडीआरएफच्या टीम, अग्निशामक दलाला पाठण्यात आले.
ही इमारत म्हाडाची होती. या इमारतीत जवळपास 15 कुटुंब राहत होते, अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने मुंबईत आज पाऊस पडत नाही, त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरु आहे. बचावकार्यादरम्यान अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
समोर आलेली मृतांची नावे : शबीया निसार शेख – (महिला 25) – जे. जे. रुग्णालय
अब्दुल सत्तार कल्लू शेख – (पुरुष 55) – हबीब रुग्णालय
जखमींची नावे फिरोज निसार सलमानी (पुरुष 45) – जे. जे. रुग्णालय आईशा शेख (3 वर्ष मुलगी) – जे. जे. रुग्णालय सलमा अब्दुल सत्तार शेख (पुरुष 55) – जे. जे. रुग्णालय अब्दुल रेहमान ( 3 वर्षीय मुलगा) – जे. जे. रुग्णालय नवेद सलमानी (पुरुष 35) – जे. जे. रुग्णालय इमरान हुसेन कलवानीया (पुरुष 30)- जे. जे. रुग्णालय अज्ञात व्यक्ती (पुरुष) हबीब रुग्णालय
LIVE UPDATE
- 5.50 PM – मृतांचा आकडा 5 वर
- 3.45 PM मृतांचा आकडा 3 वर
- 2.30 PM – डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा मृत्यू तर 7 जण जखमी
- 2.00 PM म्हाडाने 2017 मध्येच या इमारतीला नोटास पाठवली होती, ही इमारत धोकादायक असल्याचं नमूद होतं- मुंबई महापालिका
- 1.45 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते नसीम खान घटनास्थळी
- 1.43 PM मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळी भेट देण्यासाठी विधान परिषद विरोधी धनंजय मुंडे रवाना
- दुपारी 1 च्या सुमारास मृतांचा आकडा 12 वर पोहोचल्याची माहिती
- 1.10 PM : भर ट्रॅफिकमधून रुग्णवाहिका, बचावपथकं तातडीने रवाना
- 1.15 PM – आतापर्यंत 10 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
- दोन महिलांचा मृत्यू, 3 जण जखमी – मुंबई महानगरपालिकेची माहिती
- चिमुकलीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं, घटनास्थळी गर्दीमुळे बचावकार्याला अडथळे
- गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळा येत असल्याने नागरिकांनी घटनास्थळापासून दूर राहावे, मुंबई पोलिसांचे स्थानिक लोकांना आवाहन
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
कोसळलेली इमारत म्हाडाची 100 वर्ष जुनी इमारत होती, पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता, म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता, विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल, अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
दरम्यान, डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. डोंगरीतील इमार दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन. मला आशा आहे की जखमी लवकर बरे होतील. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Collapse of a building in Mumbai’s Dongri is anguishing. My condolences to the families of those who lost their lives. I hope the injured recover soon. Maharashtra Government, NDRF and local authorities are working on rescue operations & assisting those in need: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 16, 2019
स्थानिकांची प्रतिक्रिया
सुरुवातीला पाऊस आला त्यानंतर जोरात वारा आल्याने काहीतरी पडल्यासारखा वाटले. सुरुवातीला आम्हाला पत्रा पडल्यासारखे वाटले. त्यानंतर कोणीतरी बिल्डींग पडली असे मला सांगितले अशी माहिती स्थानिकांनी दिली.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची प्रतिक्रिया
कोसळलेली इमारत म्हाडाचीच होती. म्हाडाने रिडेव्हलपसाठी बिल्डरला दिली होती. लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जी इमारत कोसळली ती अत्यंत जुनी होती. कोसळलेली इमारत धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तिच्या पुनर्विकासाचं काम विकासकाला देण्यात आलं होतं. आता नेमकं काय घडलं, दुर्घटना कशी झाली, जबाबदार कोण आहे, याची सविस्तर माहिती घेऊन मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधेन, असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
VIDEO : मुंबईतील डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, जवळपास 50 जण अडकले#Kesarbaibuildingcollapsed #Dongri pic.twitter.com/NHfJzNX1eQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2019
BMC Disaster Management Cell: Kesarbai building has collapsed at Tandel street, in Dongri, Mumbai. More than 40 people are feared trapped.
— ANI (@ANI) July 16, 2019
मुंबईतील डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, जवळपास 50 जण अडकले
- अब्दुल हमीद दर्ग्याजवळ केसरबाई इमारत कोसळली
- ढिगाऱ्याखाली 40-50 जण अडकल्याची भीती
- इमारतीत जवळपास 15 कुटुंबाचं वास्तव्य
- सकाळी 11.30 च्या सुमारास इमारत दुर्घटनाग्रस्त
- कोसळलेली इमारत म्हाडाची
- दुपारी 1 पर्यंत मृतांचा आकडा 12 वर
- दोन चिमुकल्यांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं
‘सरकारवर गुन्हा दाखल करा’
दरम्यान, कोसळलेली इमारत ही जुनी होती. सरकारच्या दुर्लक्षामुळे डोंगरीतील इमारत दुर्घटना झाली आहे. सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, ही इमारत दुरुस्ती का झाली नाही याची चौकशी व्हायला हवी, भाजप-शिवसेना सरकार या दुर्घटनेला जबाबदार, अशी टीका काँग्रेस नेते मधू चव्हाण यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
“इमारत कोसळणे ही दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. प्रशासनाला याचा काहीही फरक पडत नाही. लोक मरताहेत मरु दे अशी स्थिती सध्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मृत्येचे तांडव सुरु आहे. मालाड, गोरेगाव यानंतर आता मुंबईत इमारत कोसळली. इमारती कोसळतात त्यानंतर पुढे काय?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
भाई जगताप यांची प्रतिक्रिया दुर्दैवाने सरकारी अधिकारी त्यांचं काम करत नाहीत. म्हाडाचे अधिकारी काय करत आहेत, सरकारचं दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यापूर्वी इमारतींचं ऑडीट झालं पाहिजे आणि धोकादायक इमारतींतील लोकांना वेळीच स्थलांतरीत करायला हवं. अनेक काळापासून ही मागणी आम्ही करतोय. अधिकाऱ्यांवर 302चा गुन्हा दाखल करायला हवा, तोपर्यंत अधिकारी आपली जबाबदारी निभावणार नाहीत, असं काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.