Ketaki Chitle : केतकी सीरियल क्रिमिनल, राऊतांचं स्पष्ट वक्तव्य, केतकीच्या मागे भावे की लावे? राऊत म्हणतात, ही चटक !
केतकी सीरियल क्रिमिनल आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिली आहे. या महाराष्ट्रात एक विशिष्ठ वर्ग अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली काही बोलले काहीही लिहील हे स्वातंत्र्या नाही ही विकृती आहे. असेही ते म्हणाले.
मुंबई : एकिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा गाजत आहे तर दुसरीकडे केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरण गाजत आहे. केतकी चितळेला पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उलटू लागल्या आहे.केतकी सीरियल क्रिमिनल आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिली आहे. या महाराष्ट्रात एक विशिष्ठ वर्ग अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली काही बोलले काहीही लिहील हे स्वातंत्र्या नाही ही विकृती आहे. त्याला आत्ताच लगाम घातला पाहिजे अन्यथा महाराष्ट्राची संकृती नष्ट होईल. गेल्या काही काळात आमच्या नेत्यांबाबत तुम्ही स्वातंत्र्याची कवचकुंडलं घेऊन जे हल्ले करत आहेत. ते हल्ले करण्याविषयी माझं काही म्हणनं नाही मात्र ज्या भाषेचा वापर होतोय ते आक्षेपार्ह आहे, असेही राऊत म्हणाले.
केतकी सिरीयल क्रिमिनल
तसेच यामागे कोण आहे तो पोलीस शोधतील. यात कोणतीही राजकीय व्यक्ती आहे. हे मी बोलणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्याची चटक लागते, सिरीयल क्रिमिनल असतात. त्या प्रकारचे मला या मुलीतून दिसतंय. ज्या प्रकारे ती अनेकवेळा जात धर्माचा आधार घेऊन जे करत आहे. त्याचं समर्थन करू नये. कोणी किती मोठी व्यक्ती असेल तरी हे समर्थनीय नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
कोण केतकी ओळखत नाही
याबाबत शरद पवार यांना विचारलं असता आपण संबंधित व्यक्तिला ओळखत नाही आणि नेमकं काय झालं ते प्रकरणही आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पवारांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे. हिंगोलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चागल्या दवाखान्यात न्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केतकी चितळेच्या पोस्टबाबत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. ‘त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. एका चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांना उपचार दिले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे’, असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावलाय. राष्ट्रवादीही केतकी चितळेविरोधात आक्रमक झाली आहे.
अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
केतकीविरोधात कळवा, ठाणे, बीड आदी ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोर आली आहे, तसंच राज्यात अनेक भागात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. केतकीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होती त्यानंतर केतकीवर कारवाई होणारच असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.