केतकी चितळेचे तपासात सहकार्य नाही, अजून सात दिवसांची कोठडी मागणार, सूत्रांची माहिती
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात असलेली केतकी चितळे (Ketaki Chitale) तपासात सहकार्य करत नाही, त्यामुले अजून सात दिवसांची कोठडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेली वादग्रस्त पोस्ट आणि अट्रोसिटीच्या गुन्ह्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास यावेळी करणार असल्याची माहिती […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात असलेली केतकी चितळे (Ketaki Chitale) तपासात सहकार्य करत नाही, त्यामुले अजून सात दिवसांची कोठडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेली वादग्रस्त पोस्ट आणि अट्रोसिटीच्या गुन्ह्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास यावेळी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केतकी चितळेने सोशल मीडियावर शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली तेव्हा शरद पवार यांच्या समर्थकांसर विरोधकांनीही केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन कोणीही केले नव्हते. त्यामध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतुल भातखळकर यांनीही केतकी चितळेचे समर्थन केले नव्हते.
केतकी चितळेची उद्या पोलीस कोठडी संपत असल्याने आणि ती तपासात सहकार्य करत नसल्याने तिची कोठडी वाढवून घेणार आहेत.
शाईफेकही करण्यात आली
केतकी चितळे पोलिसांनी अटक केल्यानंतरही तिच्यावरचा रोष कमी झाला नव्हता. त्यामुळे तिच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. या दोन्ही घटनेवरुन प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे आता पोलीस पुन्हा पूर्ण तपास झाला नसल्याचे सांगत केतकीची आणखी सात दिवसांची कोठडी मागणार असल्याचे सांगितले जात आहे.
केतकीचा मोबाईल व लॅपटॉप जप्त
केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी केतकीचा मोबाईल व लॅपटॉप ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले होता. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, लॅपटॉप आणि मोबाईलच्या आधारे याबाबतीत आणखी काही माहिती मिळते याचा तपास केला जाईल असे पोलील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र रबाळे पोलिसात अट्रोसिटीगुन्ह्यांतर्गत तिचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी रबाळे पोलीस ठाणे न्यायालयात उद्या मागणी करणार आहेत.
केतकीकडून सहकार्य नाही
ज्या तपासासाठी केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले गेले आहे, त्या तपासाबाबत पोलिसांना केतकी सहकार्य करत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वादग्रस्त पोस्ट आणि अट्रोसिटी गुन्ह्यांतर्गत तिचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त केला आहे. उद्या तिची पोलीस कोठडी संपत असल्याने आणि तपासात सहकार्य करत नसल्याने तिची कोठडी वाढवून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले