किरण पावसकर यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप, म्हणाले, मुद्दा एकचं माझ्या बाबांना…
आदित्य ठाकरे ते तोडगा काढू शकले नाही. पण, त्यांनी भावनिक पत्र लिहिलं
मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले, खासदार राहुल शेवाडे, आमदार सदा सरवनकर यांनी बैठक घेतली. शिवडी-वरळी उन्नत मार्गातील लोकांचा प्रश्न होता. हा प्रश्न वरळीतील आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. त्यावर दुर्लक्ष करण्यात आलं. लोकांच्या मनात भीती होती. असलेली घरं सोडून लांब कुठतही जावं लागणार होतं. काही लोकं धारावीला पाठविण्यात येणार होते. ते ज्या जागेवर आहेत त्याचं जागेवर थांबविण्यात आलं. शिरोडकर येथील जागेवर त्यांना जागा देता येईल का, यावर चर्चा सुरू आहे. लोकं तिकडेचं कसे राहतील, याची सुविधा केली जाईल, असं किरण पावसकर यांनी सांगितलं.
महाआघाडीचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे काम बघतात. कोणी काही वाईट बोललं की, महाराष्ट्राची संस्कृती काय हे समोर येते. सुसंस्कृतपणा दाखविला जातो. दुसऱ्यांना रेडे-म्हशी म्हणा. हा यांचा सुसंस्कृतपणा आहे. त्यामुळं ते कितीही बाहेर आले. आतमध्ये गेले. बाहेर आले. पुन्हा आतमध्ये गेले. तरी ते सुधारतील, असं वाटतं नाही, असा घणाघातही किरण पावसकर यांनी केला.
आदित्य ठाकरे ते तोडगा काढू शकले नाही. पण, त्यांनी भावनिक पत्र लिहिलं. यावर किरण पावसकर म्हणाले, भावनिक पत्र लिहायची. भावनिक आवाहन करून मतही घ्यायची. कधी आम्हाला त्रात कसा होतो, हे दाखवायचं. कधी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सांगायचं. कधी वडील आजार आहेत, हे दाखवायचं. पण, मुद्दा एकच आहे, माझ्या बाबांना मुख्यमंत्री करा. हा एकच मुद्दा आहे. प्रश्न कुठलेचं सोडवायचे नाहीत. तो प्रश्न आज मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडविला.
शिवसेना भवनच्या बाजूला असलेली जागेतील रहिवासी सगळे खाली केले आहेत. तरीही त्या रहिवाशांना न्याय मिळालेला नाही. सेना भवनला लागून असलेल्या रहिवाशांची ही परिस्थिती आहे. मग, मागच्या दहा वर्षात आपण काय केलंत, असा सवाल किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.