ताई, माझे आई म्हणत जेव्हा किरीट सोमय्यांनी tv9 मराठीचे प्रश्न टाळले, सोमय्या राऊतांच्या आरोपांना उत्तर टाळतायत?
राऊतांची पत्रकार परिषद संपताच राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी राऊतांनी घेतलेल्या नावांविषयी सोमय्यांना सवाल केले असाता सोमय्या टाळाटाळ करताना दिसून आले.
मुंबई : काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्यावर पुन्हा तोफा डागल्या. त्यानंतर राऊतांची पत्रकार परिषद संपताच राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी राऊतांनी घेतलेल्या नावांविषयी सोमय्यांना सवाल केले असाता सोमय्या टाळाटाळ करताना दिसून आले. किरीट सोमय्यांना जितेंद्र नवलानी (Jitendra navlani) आणि वाधवान यांच्याशी तुमचा काय संबध आहे? असा सवाल राऊतांनी केला आहे. तुम्ही नवलानीला ओळखता का? असा सावल टीव्ही 9 ने केला असता, ताई, माझे आई ऐक ना…असे म्हणताना किरीट सोमय्या दिसून आले. त्यामुळे सोमय्या टाळाटाळ करताहेत का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. त्यानंतर राऊतांनी घेतलेल्या नावांशी माझा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरणही सोमय्या देताना दिसून आले.
सोमय्या दोनवेळा भडकले
संजय राऊतांनी एका नावावर जास्त फोकस करत आरोप केले, त्या जितेंद्र नवलानी बद्दल सोमय्यांना विचारले असात आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव-डोके यांच्यावर पुन्हा सोमय्या भडकल्याचे दिसून आले. तुम्हाला काय विचारायचे आत्ताच विचारून घ्या, मी नवलानीला ओळखत नाही, खूप लोक भेटतात, माझ्या लक्षात नाही, असं संतप्त उत्तर त्यांनी दिलं. यावेळी बरेच प्रश्न सोमय्या टाळतानाही दिसून आले. त्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. नवलानीच्या सात कंपन्यांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले.15 कोटी रुपये अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. अनसिक्युअर्ट ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही, तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश चैक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकारीच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन. नवलानी कोणंय..? सौमय्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, असा सावल राऊतांनी उपस्थित केलाय. या आरोपांना उत्तर देताना सोमय्या भडकले होते.
ठाकरेंनी मला मारायला गावगुंड पाठवले
तसेच ठाकरेंनी माझ्याविरोधात कितीही आरोप करूदे, मी घाबरत नाही. तसेच उद्धव ठाकरे त्या बंगल्याविषयी का बोलत नाहीत? सामनातून माझ्याविरोधात कॅम्पेन चालवलं असाही अरोप सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्याला मारायला शंभर माणसं पाठली त्यातल्या फक्त चौदा लोकांना अटक झाली. बाकीचे कुठे आहेत, असा सवाल करत त्यात मुंबईतले गुंड आणले होते असा आरोप केला आहे. या आरोप प्रत्यारोपावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे.