मुंबईः महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे (Mahavikas Aghadi) बाहेर काढणारे, आणि सरकारमधील निम्म्यापेक्षा जास्त मंत्री तुरुंगात जाणार म्हणून सांगणाऱ्या किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या घरासमोर आता भाग सोमय्या भाग असं लिहिण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी घोटाळे (Fraud) बाहेर काढल्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. तरीही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकी वीस मीटरवर असतानाही त्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं ठळक अक्षरात लिहण्यात आले होते, त्यामुळे आता त्यांच्या विरोधात कोण उभा राहिलं आहे हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यांच्या मुलुंड कार्यालयाबाहेर जे भाग सोमय्या सोमय्या असं ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे, ती रस्त्यावरील अक्षरं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हटवण्याचे काम सुरु होते.
घोटाळे बाजांना तुरुंगात डांबणार असं जाहीर वक्तव्य करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधणाऱ्या किरीट सोमय्यांना त्यांच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं कोणी लिहिले हे मात्र सापडले नाही. त्यामुळे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली गेली आहे.
किरीट सोमय्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 57 कोटीचा अपहार केल्याचा आरोप केला गेला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच त्यांच्या घरासमोरच आता भाग सोमय्या भाग असं लिहून त्यांना एक प्रकारे डिवचण्याचाच प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या घराबाहेर हे शब्द कोणी लिहून गेले याचा शोध घेतला जात आहे.
किरीट सोमय्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली गेली आहे, त्या सुरक्षा व्यवस्थेची चौकी अगदी त्यांच्या कार्यालयापासून अगदी जवळच आहे तरीही किरीट सोमय्यांवर हे कोणी लिहिले गेले आहे याचेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याचा तपास करण्यासाठी आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांवर आता कुणी निशाणा साधला आहे हे आता पोलीस तपासानंतरच सिद्ध होणार आहे.