मुंबई : ‘ज्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले त्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलू नये आणि हिंदू धर्माची चेष्टा करू नये,’ अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले; त्यांनी हिंदू मंदिरं, घंटा, हिंदू धर्म, हिंदू पूजा पद्धती, आरतीची चेष्टा करू नये,’ असं किरीट सोमय्या म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या निवडणुकीत भाजपने कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली होती. ‘भाजपने बिहार निवडणुकीत सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली. मग बाकीचा देश बांगलादेश, पाकिस्तान, कझाकिस्तान आहे का? केंद्र सरकार तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात. काहींना मोफत लस काहींना विकत, हे देशाच विभाजन योग्य आहे का,’ असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यांच्या या टीकेचाही सोमय्या यांनी समाचार घेतला. बिहारमध्ये भाजपने कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. बिहार राज्यात नितिशकुमार आणि भाजपचे सरकार आल्यावर जनतेला ही लस मोफत देण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नितीशकुमार मदत घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला जर मोफत लस द्यायची असेल तर महाराष्ट्र सरकारनेही पुढाकार घ्यावा. सरकारने नरेंद्र मोदींची मदत घेऊन राज्यातील जनतेला कोव्हिड लस मोफत द्यावी, असा सल्लाही सोमय्या यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. त्यांनतर विरोधकांनाही ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
संबंधित बातम्या : काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे
(Kirit Somaiya criticizes Uddhav Thackerays on commenting on hindu dharma)