आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शड्डू ठोकला आहे. किरिट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Kirit Somaiya Anand Adsul)

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूल यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 9:03 AM

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul) यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शड्डू ठोकला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचं म्हटलंय. तसेच, त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीआयएल (HDIL) या कंपनीकडून देणगी स्वीकारल्याचाही गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. (Kirit Somaiya demands inquiry of Anand Adsul for city bank scam and HDIL scam)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नंतर आता आनंदराव अडसूळ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी स्व:त अडसूळ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ईडी (ED) आणि आरबीआयला (RBI) केली आहे. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या परिवाराची भूमिका असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच एचडीआयएल या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून त्यांनी 1 कोटी रुपयांची देणगी स्वीकारल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय. सोमय्या यांनी ईडी आणि आरबीआयला या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आनंद अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

“आनंदराव अडसूळांची केस दाबण्याचा प्रयत्न”, कागदपत्र घेऊन रवी राणा ED कार्यालयात

किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर

(Kirit Somaiya demands inquiry of Anand Adsul for city bank scam and HDIL scam)

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.