VIDEO: कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांची 89 पानांची तक्रार, आझाद मैदान पोलिसांविरोधातही तक्रार करण्याचा इशारा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीत आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

VIDEO: कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांची 89 पानांची तक्रार, आझाद मैदान पोलिसांविरोधातही तक्रार करण्याचा इशारा
कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांची 89 पानांची तक्रार, आझाद मैदान पोलिसांविरोधातही तक्रार करण्याचा इशारा
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:42 AM

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (jumbo covid centre) कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीत आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात येऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी 89 पानांची तक्रार दाखल केली. यावेळी अॅड. विवेकानंद गुप्ता त्यांच्यासोबत होते. संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोव्हिड पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केला. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांद्वारे कंत्राट मिळवलं या सर्वांची माहिती पोलिसांना दिली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. कोव्हिड सेंटरचं कंत्राट मिळवण्यासाठी बीएमएसवाल्याला एमडी दाखवलं. बोगस कागदत्रांच्या आधारे कंत्राट घेतलं. कंपनी अस्तित्वात नसतानाही कंत्राट मिळवण्यात आलं. विशेष म्हणजे अर्जच आलेला नसतानाही पालिकेच्या अधिकाऱ्याने कंत्राट दिलं. त्यामुळे यांच्याविरोधात फौजदारी करावी, अशी मागणी पोलिसांना केली आहे. पोलिसांना आता याप्रकरणी सात दिवसात एफआयआर दाखल करावा लागेल. नाही तर आझाद मैदान पोलीस ठाण्याविरोधातच आझाद मैदान कोर्टात तक्रार करू, असं सोमय्या म्हणाले.

बोगस कागदपत्रे दाखवून कंपनी स्थापन

कंपनी अस्तित्वात नसतानाही 100 कोटींचं कंत्राट दिलं. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात कारवाई झाली पाहिजे. इटर्नल हेल्थ केअर नावाची कंपनीही स्थापन केली. बोगस कागदपत्रं दाखवून सुजीत पाटकर यांनी ही कंपनी स्थापन केली, असा दावाही त्यांनी केला.

हुल काय देता?, उत्तरे द्या

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचीही खिल्ली उडवली. बाबा बाबा बाबाबाबा संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा. या घोटाळ्याची कागदपत्रं दिली तरी उद्धव ठाकरे का कारवाई करत नाही? सोमय्या रोज डॉक्यूमेंट देत आहे. कागदपत्रं खोटी असतील तर मला अटक करा. धमक्या कुणाला देता? सोमय्यावर गुन्हा दाखल करू, मेधा सोमय्यांवर गुन्हा दाखल करू, निल सोमय्यांवर गुन्हा दाखल करू. माझ्यावर अजून केसेस करा. पण सोमय्या थांबणार नाही. ठाकरे पितापुत्राला उत्तर द्यावंच लागेल. फालतू हूल देत आहात. पाटकरला, चायवाल्याला समोर आणताय. माझ्या प्रस्नाची उत्तरे द्या. कंपनी कधी स्थापन झाली. तुमचं उत्पन्न काय हे दाखवा, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut vs BJP LIVE Updates : ‘ते’ साडे तीन लोकं कोण? आज उत्तर मिळणार! पण किती वाजता?

सौ सोनार की एक लोहार की; पत्रकार परिषदेपूर्वीच संजय राऊतांचा सूचक इशारा

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पाहून कपिल शर्मा स्वतःला तिच्यासोबत सेल्फी घेण्यापासून रोखू शकला नाही, पाहा खास फोटो!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.