Video: अन्वय नाईक खोटं बोलत होते? बोलता बोलता किरीट सोमय्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतलं, काय आहे कनेक्शन?

अन्वय नाईक 2009 पासून कर भरत आहेत. अन्वय नाईक खोट बोलत होते. अन्वय नाईक चिटिंग करत होते, असं म्हणत किरीट सोमय्यांनी तोंडावर हात मारुन घेतले.

Video: अन्वय नाईक खोटं बोलत होते? बोलता बोलता किरीट सोमय्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतलं, काय आहे कनेक्शन?
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:40 AM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे, असं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी कोर्लई मध्ये घेतलेल्या जमिनीवरील घरांची पाहणी करण्यास सोमय्या आज जाणार आहेत. अन्वय नाईक (Anway Naik) यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यावसायिक संबंधाविषयी किरीट सोमय्या बोलताना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक खोटं बोलत होते का? असं म्हटलं आणि थोड्याच वेळात त्यांनी स्वत: च्या थोबाडीत मारुन घेतलं.अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीनं माध्यमांना किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळं मानसिक त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. मृत व्यक्तीसंदर्भात बोललो असल्याचं लक्षात येताचं किरीट सोमय्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतलं. किरीट सोमय्या आरोप करताना शब्दांचा वापर जपून करत असल्याचंही दिसून आलं आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

सप्टेंबर 2020 पासून पाठपुरावा करत आहे. गावातील लोकांनाही समजून घ्यायचं आहे. आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचं नाही. आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्या प्रकरणाला समजून घ्यायचं आहे. आज बंगले आहेत की नाहीत हे समजून घ्यायचं आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे परिवार खोटं बोलू शकत नाही. तिथला सरपंच काय बोलतो ते महत्त्वाचं नाही. जानेवारी त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज भरला होता. अन्वय नाईक 2009 पासून कर भरत आहेत. अन्वय नाईक खोट बोलत होते. अन्वय नाईक चिटिंग करत होते, असं म्हणत किरीट सोमय्यांनी तोंडावर हात मारुन घेतले.

पाहा व्हिडीओ

निवडणूक प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंनी 5 कोटी 18 लाख रुपये लपवले

कोर्लई ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने जानेवारी 2019 मध्ये जमीन नावावर करणयासाठी अर्ज केला. मे 2020 मध्ये ही सर्व घर रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावावर करण्यात यावी असा ठराव मंजूर झाला. ठाकरे परीवाराच्या बॅक अकाऊंट मधून ग्रामपंचायतीसाठी असणारे सर्व टॅक्स भरण्यात आले. 2020 आणि 2021 च्या पावत्या या रश्मी ठाकरे यांच्या नावाने देण्यात आल्या. मात्र, निवडणूक प्रतिज्ञापत्रात 5 कोटी 18 लाख रुपयांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बातमी लपवल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

19 बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. मी ज्यावेळी आधी कोर्लई येथे गेलो तेव्हा त्या सरपंच यांनी असाच विरोध केला होता. घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे.ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. सप्टेंबर 2020 पासून मी पाठपुरावा करत आहे.ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदे दिली आहे त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी इन्कार केलेला नाही. साडे 12 कोटी जनतेला जाणून घ्यायचे आहे यासाठी मी जात आहे. मी पोलीस प्रशासनाला विरोध करणार नाही. कारण मला कोणतीही दंगल करायची नाही. जर मला पोलिस प्रशासनाने विरोध केला तर मी त्यांच्या हातात अर्ज देणार आणि पुन्हा वेळ दिला की जाईन, असं किरीट सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या:

देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले, कोर्लाईला जाताना सकाळी सकाळी सोमय्यांनी तोफ डागली

कोल्हापूरच्या कौशिकी जाधव हिची भरारी, ऑस्ट्रेलियातील शिक्षणासाठी मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.