अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते शुद्धीत नव्हते. (kirit somaiya reaction on ed inquiry of anil parab)
मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते शुद्धीत नव्हते. अनिल परब यांनी ईडीला काय कबुली जवाब दिला हे तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीत आहे काय? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला. यावेळी त्यांनी विविध घोटाळ्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अनिल परब ईडीकडे काय बोलले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहीत आहे का? अनिल परबांना शुद्ध नव्हती, असं सोमय्या म्हणाले.
परमबीर सिंग भगोडे, मग पत्रं गांभीर्याने कसे घेता?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. परमबीर सिंग यांच्यावर त्यांच्या बॉसने 17 केसेस दाखल केल्या आहेत. ते भगोडा आहेत. मग त्यांच्या पत्राला गांभीर्याने कसे घेता? असा सवाल त्यांनी केला.
तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार
आज सकाळी सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजर राहिलो. अभिनेता भाऊ कदमचा कार्यक्रम होता. भाऊ कदम सांगतात, आम्ही दिवाळीत फटाके फोडतो. किरीट सोमय्या वर्षभर फटाके फोडतात. दिवाळीनिमित्त आज बायकोच्या हातची करंजी खाल्ली. आता पुढच्या दर आठवड्यात एकाएका मंत्र्याचा पाठपुरावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या महिन्याभरात ठाकरे सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या मंत्र्यांचं राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठं वजन आहे, असं सांगतानाच या मंत्र्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
ती संपत्ती अजितदादांचीच
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अजित पवारांची ही संपत्ती बेनामी आहे. त्यांचं नाव जरी त्यात नसलं तरी ही संपत्ती त्यांचीच आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच मला अनेकांनी मानहानीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. संजय राऊतांनी ईडीकडे पैसे परत केले. त्यानंतर मला त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
जानेवारीत 10 नेते आत जातील
येत्या 1 जानेवारीला 10 नेते प्राथमिक चौकशी होऊन ते गुन्हेगार ठरतील. काही जेलमध्ये असतील तर काही रुग्णालयात असतील, असा दावाही त्यांनी केला. तसेच आज चोपडा पूजन आहे. त्यामुळे आज मी घोटाळ्यांच्या गाठोड्याचं पूजन करणार आहे. या घोटाळ्यातील लक्ष्मी कुठे गेली याचा शोध घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 4 November 2021 https://t.co/wBggRzYdlT #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2021
संबंधित बातम्या:
नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी
(kirit somaiya reaction on ed inquiry of anil parab)