24 महिन्यात 24 घोटाळं करणारं इतिहासातील पहिलं सरकार, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या निमित्तानं राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागलीय.

24 महिन्यात 24 घोटाळं करणारं इतिहासातील पहिलं सरकार, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
किरीट सोमय्या, भाजप नेते
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:57 PM

मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या निमित्तानं राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागलीय. महाविकास आघाडी म्हणजे महावसुली सरकार आहे. महावसुली सरकार हे आज पर्यंतच्या इतिहासात पाहिले सरकार पाहिले आहे की 24 महिन्यात 24 मोठे घोटाळे केले आहेत. ठाकरे मंत्रिमंडळातील 12 मंत्री नेत्यांवर कारवाई सुरु आहे. अर्धा डझन मंत्री किंवा नेते जेलमध्ये जाणार आहेत. या नेत्यांनी आणि ठाकरे सरकारनं महाराष्ट्राला लुटण्याचे काम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

कोविड काळात सर्वाधिक लूट

किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळातील कामावरुन देखील आरोप केले आहेत. कोविडमध्ये मध्ये सर्वात जास्त लुटण्याचे काम या सरकारने केले आहे. त्याच बरोबर सर्वात जास्त मृत्यू कोविड काळात मुंबई झाले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पडेल किंवा सत्तेत राहणार त्याच्याशी घेणे देणे नाही. मात्र, या सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. या सरकारने कोविड मध्ये हत्या करण्याचे काम केले आहे, असा आरोप सोमय्यांनी केला. माहविकास आघाडीच्या सरकारनं कोविड मध्ये घोटाळे केले आहेत. ते 31 डिसेंबर पर्यंत आणखी अर्धा डझन नेते न्यायालयाचे धक्के खाणार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

अर्जुन खोतकर यांनी कारखाना बळकावला

शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जबरदस्तीने साखर कारखाना बळकावला आहे . मार्केट घोटाळा झाला आहे. 1 डिसेंबरला मी जालना मध्ये जाणार आहे. तीन दिवस झाले अजूनही ईडीची कारवाई सुरु आहे म्हणजे किती पैसे अर्जुन खोतकर यांनी ढापले असतील याचा विचार करावा, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.

अमरावतीला जाण्यापासून अडवलं

मी अमरावतीला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.मला अडवण्याचे काम ठाकरे सरकारने केले .. ज्या पद्धतीने मुस्लीमाचे मोर्चे काढण्यात आले होते ते चिंताजनक आहे. मी अमरावतीमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम शनी मंदिरात जाऊन भेट घेणार त्या ठिकाणी पुजाऱ्याला मारहाण झाली होती.तसेच दुसऱ्या बाजूला अमरावतीचे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या घोटाळ्यासंदर्भात जनेतशी बोलणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

परमबीर सिंग यांनी ज्या दिवशी ठाकरे सरकारच्या अनिल देशमुख यांचा घोटाळा उघडकीस आणला त्या नंतर त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल केले आहेत. त्या बाबत चौकशी करा त्यात गुन्हेगार असेल तर कारवाई करावी असं किरीट सोमय्या म्हणाले.

इतर बातम्या:

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलची MMS आणि MCA अभ्यासक्रमाची 5 डिसेंबरला प्रवेश परीक्षा, नोंदणीसाठी उरले काही तास

Aurangabad: चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपूलः डीपीआरचा प्रस्ताव दिल्लीत दाखल, अंदाजे 2 हजार कोटींचे बजेट!

Kirit Somaiya said Thackeray Government did 24 scams in 24 months

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.