शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर, सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. (kirit somaiya taunt chhagan bhujbal over maharashtra sadan case)

शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर, सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 3:54 PM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (kirit somaiya taunt chhagan bhujbal over maharashtra sadan case)

किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

चार दिन की चांदनी

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरलं. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असं वाटतं. पाच- पंधरा दिवस त्यांना शेरोशायरी करू द्या, असा चिमटा सोमय्या यांनी काढला.

120 कोटी रुपये कुठून दिले

ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबलं ती केस प्रकरण अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की उड्या मारू नका. 120 कोटी रुपये रोख दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा, असा सवाल त्यांनी केला आहे.

राजमहल कुणाचा ते सांगा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचं नाही. कारण ही लूट आहे. मंत्री आणि सरकार शेरोशायरी करत असतील पण सोमय्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला जबाबदार आहे. त्यामुळे भुजबळांचे 120 कोटींची चोरी आम्ही पकडून दिली, असं सांगतानाच शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता तो राजमहल कुणाचा ते सांगा?, असा सवालही त्यांनी केला. (kirit somaiya taunt chhagan bhujbal over maharashtra sadan case)

संबंधित बातम्या:

‘माणुसकीला काळिमा फासणारी घटना, समाज हादरुन गेलाय’, चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी

धन्य ते आई-बाप! नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी, आई-वडिलांना पहिलीच विमानाची सैर!

Saki Naka rape : आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

(kirit somaiya taunt chhagan bhujbal over maharashtra sadan case)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.