Sanjay Raut: स्युमोटो ॲक्शन घेऊन सोमय्यांना ताब्यात घ्या, राऊतांचे कागदपत्रं दाखवत ईडीला आवाहन

Sanjay Raut: किरीट सोमय्यांचं प्रतिष्ठान आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील ते स्वत:ला महात्मा समजतात.

Sanjay Raut: स्युमोटो ॲक्शन घेऊन सोमय्यांना ताब्यात घ्या, राऊतांचे कागदपत्रं दाखवत ईडीला आवाहन
स्युमोटो अॅक्शन घेऊन सोमय्यांना ताब्यात घ्या, राऊतांचे कागदपत्रं दाखवत ईडीला आवाहन Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 10:58 AM

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड केला आहे. राऊत यांनी मीडियासमोर कागदपत्रं दाखवून सोमय्या यांना ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून पैसा कसा आला? असा सवाल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी लिमिटेड कंपनीमध्ये ईडीची रेड पडली आहे. या मेट्रो डेअरीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कंपनीकडून सोमय्यांच्या खात्यात लाखो रुपये आले आहेत. कालही मी या प्रकारच्या कंपन्यांची नावे घेतली होती. जवळपास 150हून अधिक कंपन्यांकडून सोमय्यांना पैसा मिळाला आहे. त्यांच्याशी सोमय्यांचा व्यवहार झाला. ईडीत (ED) हिंमत असेल, एनआयएमध्ये हिंमत असेल तर या कंपन्या आणि सोमय्यांचे काय संबंध आहेत हे सांगा. ईडीने स्युमोटो अॅक्शन घेऊन सोमय्यांना ताब्यात घ्यावं आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावेळी राऊत यांनी मेट्रो डेअरी कंपनीकडून चेक मार्फत सोमय्यांच्या प्रतिष्ठानच्या खात्यात रक्कम आल्याचं सांगत याबाबतचे कागदपत्रंही दाखवली.

किरीट सोमय्यांचं प्रतिष्ठान आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील ते स्वत:ला महात्मा समजतात. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार हे त्याचं वाक्य आहे. पण भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांनीच केली. दोन दिवसापासून युवक प्रतिष्ठानच्या खात्यात जे पैसे आले त्याची माहिती मी देत आहे. दीडशेहून अधिक कंपन्या आहेत. ईडी आणि सीबीआयची चौकशी असलेल्या या कंपन्यांकडून सोमय्यांना लाखो करोडोचे डोनेशन मिळाले आहे. तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढताना मग डोनेशन कसे घेतले? असा सवाल राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

हे नवलानी पार्ट टू

ईडीने स्यूमोटो अॅक्शन घेतली पाहिजे. हा फक्त चेक आहे. थोडा चेक आणि थोडे पैसा असा व्यवहार युवक प्रतिष्ठानशी या कंपन्यांनी केला आहे. हे नवलानी पार्ट टू आहे. तुम्ही इतरांवर स्युमोटो कारवाई करताना आता ईडी, सीबीआयने सोमय्यांना तात्काळ ताब्यात घेऊन हा पैसा कुठून आला त्याची चौकशी सुरू करावी. कॅशची माहिती माझ्याकडे आहे. चेकचीही आहे, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांची प्रतिष्ठा कमी होतेय

तुम्ही पत्नीच्या प्रतिष्ठेच्या गोष्टी करता. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता इतर स्त्रीयांना प्रतिष्ठा नसते का? प्रतिष्ठा काय तुमच्या घरी नाचते का? प्रतिष्ठा सर्वांना आहे. आता सोमय्यांचा बुरखा फाटला आहे. देशातील जे सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत त्यात सोमय्या आहेत. सोमय्या खंडणी वसूल करतात. सीबीआय, ईडीचा वापर करून लोकांना धमकावतात. त्याच्यासोबत फडणवीस भ्रष्टाचारावर चर्चा करतात… महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी फडणवीसांसोबत त्यांनी चर्चा केली. पण यातून फडणवीसांचीच प्रतिष्ठा कमी होत आहे, असंही ते म्हणाले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.